आधी सख्ख्या बापाने पोटच्या मुलीच्या शरीराचे लचके तोडले नंतर काका अन् शेजारच्या म्हाताऱ्यानेही ल
गुन्हा करू नका:अकोला जिल्ह्यातून धक्कादायक आणि माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. जन्मदात्या पित्याने 12 वर्षांच्या पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला. सुरुवातीला वडिलांकडून पुढे काकाने आणि त्यानंतर शेजारी राहणाऱ्या आजोबाने देखील या अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण केलंय. अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यातल्या अडसूळ गावातील ही घटना आहे. (Akola Crime)
दरम्यान, या धक्कादायक प्रकरणाचं गांभीर्य पाहता तेल्हारा पोलिसांनी तात्काळ दखल घेत कुटुंबातीलच 2, अन् शेजारील आजोबाविरुद्ध गंभीर स्वपरूपाचे गुन्हे दाखल केले. दरम्यान, त्रास सहन न झाल्यानं मुलीनं अखेर शाळेतील शिक्षकांसमोर वडिलांसह इतरांची तक्रार केली होती. त्यानंतर हे संपूर्ण धक्कादायक प्रकरण उघडकीस आलं आहे.
शाळेतील मुख्याध्यापकांसमोर समोर आला प्रकार
दरम्यान, गावातील शाळेतील मुख्याध्यापकांसमोर या पीडित अल्पवयीन मुलीने घडलेला प्रकार सांगितला. तिचं म्हणणं ऐकल्यानंतर सर्वांना मोठा धक्का बसला. त्याचवेळी ‘चाईल्ड लाईन’च्या महिला अधिकाऱ्यांकडून शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन, समुपदेशन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतंय. या दरम्यान चाईल्ड लाईन आणि शाळेतील मुख्याध्यापक गणेश ठाकरे यांनी घटनेचे गांभीर्य पाहता तातडीने तेल्हारा पोलीस ठाण्यात दाखल झाले. पोलिसांनी देखील हे प्रकरण तितकच गांभीर्याने घेतलं आहे. मुख्याध्यापकाच्या तक्रारीनंतर वडीलांसह काका आणि शेजारी राहणाऱ्या एका म्हाताऱ्यावर गुन्हे दाखल केले. अपराध क्रमांक 382/25 कलम 64(2)(f),(m), 65(1) BNS सह 4,6,8 बाल संरक्षण कायद्याअंतर्गत हे गुन्हे दाखल झाले आहेत.
बापाने पोटच्या पोरीचे लचके तोडले, नंतर…
तेल्हारा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वडील आणि काका गेल्या 6 दिवसांपासून या अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण करत होते. पोलिसांनी या प्रकरणात आरोपी वडील आणि शेजारी राहणाऱ्या आजोबाला अटक केली आहे. तर नराधम काका हा फरार आहे, तो मागील 20 दिवसांपासून पुणे येथे आहे. पीडितेचं वय 12 वर्ष 8 महिने 22 दिवस असल्याचं पोलिसांनी सांगितलं. याप्रकरणी अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक निलेश ठाकरे करत आहेत.
आणखी वाचा
Comments are closed.