ठाकरेंच्या कॉलनंतर प्रशांत जगतापांना एकनाथ शिंदेंची काऊंटर ऑफर, मात्र जगतापांनी तात्काळ ऑफर फेट

Prashant jagtap : पुणे महानगरपालिकेमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित लढणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या, बैठका, गाठीभेटी वाढल्या, यादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे पुणे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पक्षाच्या प्राथमिक व क्रियाशील सदस्यत्वाचा राजीनामा दिला. पुणे महानगर पालिकेच्या समोर प्रशांत जगताप यांनी पत्रकार परिषद घेत राजीनामा दिला आहे. आजपर्यंत दिलेल्या संधीसाठी नेतृत्वाचे त्यांनी आभार मानले आहेत. त्यानंतर आता प्रशांत जगताप हे काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करणार असल्याच्या चर्चा असतानाच त्यांना उध्दव ठाकरे यांनी देखील शिवसेना ठाकरे गटात येण्याबाबत ऑफर दिली, त्यानंतर आता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी देखील प्रशांत जगताप यांना फोन केला असल्याची माहिती समोर आली आहे.

Prashant Jagtap news: एकनाथ शिंदेंचा जगतापांना फोन…

एकनाथ शिंदे यांनी प्रशांत जगताप यांना काही वेळापूर्वीच फोन केल्याची माहिती समोर आली आहे.  मात्र प्रशांत जगताप यांनी शिंदेशी बोलणे टाळले असल्याचं समोर आलं आहे. शिवसेना पक्षात येण्याची एकनाथ शिंदे यांची प्रशांत जगताप यांना ऑफर होती का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. एकनाथ शिंदे यांची शिवसेना, त्याचबरोबर उध्दव ठाकरे यांची शिवसेना देखील प्रशांत जगताप यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी इच्छुक असल्याचं कळतंय मात्र, जगताप हे काँग्रेसच्या विचारधारेचे असल्याने ते काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश करतील अशी शक्यता आहे.

Prashant Jagtap news: प्रशांत जगतापांना ठाकरेंची देखील ऑफर दिली, नेमकं काय घडलं?

या पक्षप्रवेशाबाबत एबीपी माझाशी बोलताना प्रशांत जगताप म्हणाले, मी उद्धव ठाकरे आणि सचिन आहिर यांचे आभार मानतो. माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याशी बोलायला त्यांनी वेळ दिला. या राज्यातील आक्रमक चेहरा आणि भाजपशी दोन हात करण्याची तयारी असलेला नेता माझ्याशी फोनवर बोलला. त्यांनी माझ्या भावना समजवून घेतल्या. तुम्ही आमच्या पक्षात काम करु शकता, असे त्यांनी सांगितले. मी भाजप किंवा महायुतीमधील तिन्ही पक्षांमध्ये कुठेही जाणार नाही. आज मी माझ्या राजकीय जीवनाचा योग्य तो निर्णय घेईन. पण मी उद्धव साहेबांचा कायम ऋणी राहीन. त्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याची योग्यता समजून घेतली. पण पुढील दोन-तीन तासांमध्ये माझा निर्णय होईल.

माझी लढाई ही संविधानासाठी आणि पुरोगामी चळवळीसाठी आहे. ती कुठल्याही एखादा नेता आणि पक्षाच्या विरोधातील आहे. त्यामुळे आज जे भाजप सरकारला आव्हान देऊ शकतात, महायुती सरकारला आव्हान देऊ शकता, अशा पक्षाची निवड मी करेन.

पुढील दोन तीन तासांमध्ये मी निर्णय घेईन. भाजपचा कडवा विरोधक म्हणून उद्धव साहेबांची ओळख राज्यात आणि देशात आहे. कारण त्यांचा पक्ष, त्यांचे चिन्ह, त्यांनी तयार केलेले कार्यकर्ते भाजपने ज्या पद्धतीने पळवले आणि त्यांच्याच विरोधात उभे केले, अशा परिस्थितीत खचून न जाता तडजोड न करता उद्धव ठाकरे ज्याप्रकारे लढत आहेत, ही उल्लेखनीय बाब आहे. त्यांच्याकडे इतका जनमताचा रेटा आहे त्या नेत्याने माझ्यासारख्याशी फोनवर साडेनऊ मिनिटांची वेळ देणे, ही माझ्या आयुष्यातील कायमस्वरुपी आठवण आहे. मी लहान कार्यकर्ता आहे. पुण्याच्या भल्यासाठी तुम्ही आमच्यासोबत काम करु शकता, असे उद्धव साहेबांनी सांगितले. ही माझ्यासाठी  गोष्ट आहे.

आणखी वाचा

Comments are closed.