नीलम गोऱ्हे कमर्शियल पद्धतीने उमेदवारांना तिकीटं देतायत, भाजपच्या सांगण्यानुसार वागतात; पुण्यात

पुणे: पुणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये भाजप आणि शिवसेना (BJP And Shivsena) एकत्रित युतीमध्ये लढणार असल्याचं चित्र आहे. मात्र, अद्यापही जागावाटपावरून दोन्ही पक्षाकडून तोडगा निघालेला नाहीये, अशातच शिवसेनेनं (BJP And Shivsena) मागितलेल्या २० ते २५ जागा द्यायला भाजप तयार नाहीये अशातच काही नाराज इच्छुक उमेदवार, कार्यकर्ते हे शिवसेना शिंदे गटाच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांच्या घरासमोर जमले आहेत, ते घोषणाबाजी करत आहेत. अशातच आज इच्छुक उमेदवारांनी आणि कार्यकर्त्यांना नीलम गोऱ्हेंच्या घरासमोर आंदोलन केलं, त्याचबरोबर नाराज शिवसैनिकांनी यावेळी त्यांच्यावरती गंभीर आरोप देखील केले आहेत.(BJP And Shivsena)

Pune Election Shivsena: काही इच्छुक उमेदवार आपल्या कार्यकर्त्यांसह नीलम गोऱ्हे यांच्या निवासस्थानाबाहेर

महानगरपालिकेत भाजप शिंदेंची शिवसेना एकत्रित लढण्याबाबत चर्चा सुरू आहेत. शिंदे गटाने मागितलेल्या जागा देण्यास भाजप तयार नाही. अशातच काही इच्छुक उमेदवार आपल्या कार्यकर्त्यांसह नीलम गोऱ्हे यांच्या निवासस्थानाबाहेर जमले आहेत. अनेक इच्छुकांवरती अन्याय होत असल्याचा आरोप या कार्यकर्त्यांनी यावेळी केला आहे. नीलम गोऱ्हे यांच्या घराबाहेर सर्वजण जमले यावेळी  त्यांनी घोषणाबाजी केली आहे, नीलम गोऱ्हे यांच्या घराबाहेर पोलिसांचा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला आहे, पुण्यात भाजप आणि शिवसेना महानगरपालिका निवडणुकीमध्ये एकत्रित लढणार असल्याचं समोर आलं होतं मात्र जागा वाटपावरून अद्यापही त्यांच्यात एकमत झालेला नाही, या सर्व घडामोडी मध्ये शिवसेनेचे कार्यकर्ते नाराज झाल्याचे दिसून येत आहे.

Pune Election Shivsena: अहवाल घेऊन गेल्यानंतर न बघता बाजूला ठेवला जातो

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून वीस ते पंचवीस जागांची मागणी करण्यात आली आहे, शिवसेनेला एवढ्या जागा देण्यास भाजपने मात्र नकार दिल्याचा दिसून येत आहे, त्यामुळे इच्छुक उमेदवारांचा पत्ता कट होण्याची धाकधूक वाढल्याने इच्छुक उमेदवारांनी नीलम गोऱ्हे यांच्या घरासमोर जोरदार घोषणाबाजी यावेळी केली, त्याचबरोबर त्यांनी यावेळी गंभीर स्वरूपाचे आरोप केले आहेत. पक्षातील इच्छुक उमेदवारांनी आणि कार्यकर्त्यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं की, आमचं म्हणणं आहे की, शिवसैनिकांवरती अन्याय झालेला आहे, तिकिटांचे वाटप चालू आहे, 500 ते 700 लोकांचे जे फॉर्म भरलेले आहेत, फॉर्म भरताना जे कार्यकर्ते पाच वर्ष काम करत आहेत, तो अहवाल घेऊन गेल्यानंतर न बघता बाजूला ठेवला जातो, ते अहवाल बघत होते शिवतारे बापू, ते ग्रामीण भागातील आहे, त्यांना पुणे शहरातलं काय माहिती नाही, त्यांना पुणे ग्रामीणचं माहिती असेल शहराचा काहीही माहिती नाही, आम्ही दिलेला तो अहवाल बघितला देखील गेला नाही, त्यांनी तिथे गेल्यावर विचारलं की, तुमच्या भागात भाजपच्या किती आहे, चार आहेत तुमचा काही होणार नाही, भाजपच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार आहे का?, तुम्ही शिवसेनेला ताकद देत आहात की तिचं खच्चीकरण करत आहात? असा सवाल देखील यावेळी इच्छुकांनी उपस्थित केला आहे.

Pune Election Shivsena: शिवसेनेच्या नेत्यांनी पक्ष निवडणुकीची तिकिटे कमर्शियल पदधतीने द्यायचं ठरवलंय

तर एकनाथ शिंदे यांचं पूर्णपणे खच्चीकरण सुरू आहे, आमची खूप आधीपासूनची ही खदखद आहे, ती खदखद व्यक्त करायला आज इथे आलो आहे, पण ते नेते भेटत नाहीत, ज्या भागामध्ये नीलम गोऱ्हे राहतात, त्या भागामध्ये आजपर्यंत शिवसेनेचा नगरसेवक झालेला नाही, कारण त्यांनी कधीही शिवसेना इकडे वाढू दिली नाही, त्यामुळे सगळ्या गोष्टींना ह्या कमर्शियल करतात, असा आरोपही यावेळी जमलेल्या इच्छुकांनी आणि कार्यकर्त्यांनी केला आहे. निलम गोऱ्हे आणि शिवसेनेच्या पुण्यातील शिवसेनेच्या नेत्यांनी पक्ष निवडणुकीची तिकिटे कमर्शियल पदधतीने द्यायचं ठरवलंय. भाजपने सांगितलं फक्त ऐकण्याच काम शिवसेनेचे नेते करतायत. जो प्रामाणिकपणे काम करतो त्याला निलम गोऱ्हेंसारखा घरासमोर पोलिस बंदोबस्त ठेवावा लागत नाही. निलम गोऱ्हेंनी राजीनामा द्यावा, अशी मागणी संतप्त कार्यकर्त्यांनी केली आहे.

आणखी वाचा

Comments are closed.