पुण्यात ठाकरेसेना 91 तर मनसे 74 जागा लढणार, राज-उद्धव अंतिम फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब करणार
पुणे: राज्याच्या राजकारणात गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेली शिवसेना ठाकरे (Shivsena UBT) गटाची आणि मनसेची (MNS) युती झाली. युतीची घोषणा ठाकरे बंधुंनी पत्रकार परिषद घेत केली, मात्र यावेळी ‘आमची युती झाली, कोण किती आणि कोणाला किती जागा मिळणार हे आम्ही सांगणार नाही’, असं म्हणत राज ठाकरेंनी पत्रकार परिषदेला फुल स्टॉप दिला. मात्र दोन्ही पक्षाच्या जागावाटपाबाबतचा फॉर्म्युला समोर आला आहे. पुणे महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे गट शिवसेना आणि मनसेचे गणितं ठरलंं असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. पुणे महानगरपालिका निवडणुकीत एकूण १६५ जागा असून यात ९१ शिवसेना तर ७४ मनसे या फॉर्मुल्याने शिवसेना ठाकरे गट आणि मनसे महापालिकेची निवडणूक लढवणार असल्याची माहिती समोर आली आहे.
Pune Municipal Election: शिवसेना ९१ तर मनसे ७४ जागा लढविणार असल्याचा फॉर्म्युला
पुणे महापालिका निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची युती झाली आहे. मात्र मनसेला महाविकास आघाडीमध्ये घ्यायचं की नाही, याबाबतचा निर्णय अजूनही प्रलंबित आहे. इतर युतींबाबत चर्चा, बैठका सुरू असल्याचं चित्र आहे. मात्र शहरातील युतीचे जागा वाटपही जवळपास निश्चित झालं असल्याचं बोललं जातंय. शिवसेना ९१ तर मनसे ७४ जागा लढविणार असल्याचा फॉर्म्युला समोर आला आहे.
Pune Municipal Election: …तर या फॉर्म्युल्यामध्ये काहीसा बदल होण्याची शक्यता
गेल्या काही दिवसांपासून जागावाटपाबाबत आणि युतीबाबत चर्चा सुरू होती, दोन्ही पक्षांच्या स्थानिक नेत्यांची जागा वाटपाची बोलणी झाली. त्यासंदर्भातील बैठकाही झाल्या. या बैठकीतील चर्चेनंतर शिवसेनेला ९१ आणि मनसेला ७४ जागा मिळणार असल्याची माहिती पक्षातील पदाधिकाऱ्यांनी दिल्याचं वृत्त एका मराठी वृत्तवाहिनीने दिले आहे. त्याचबरोबर इतर पक्ष जर मनसे आणि शिवसेना ठाकरे पक्षासोबत आले तर या फॉर्म्युल्यामध्ये काहीसा बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण जर काँग्रेस सोबत आली नाही तर ठाकरे सेना आणि मनसेचा ९१-७४ हाच फॉर्म्युला कायम राहणार असल्याची चर्चा आहे.
पुणे महानगरपालिकेची सद्यस्थिती काय? (Pune Municipal Election)
41 प्रभागात एकूण 165 जागा आहेत. हे नगरसेवक थेट जनतेतून निवडून दिले जातात.
पुणे महापालिका निवडणूक पुणे महानगरपालिकेचा 2017 निवडणूक निकाल
(पुणे महापालिका निवडणूक 2026)
भारतीय जनता पक्ष (भाजप)- 97
राष्ट्रवादी काँग्रेस (NCP)- ३९
काँग्रेस-9
शिवसेना- 10
मनसे- 2
एमिम- १
अपक्ष / इतर- 4
एकूण- 162
आणखी वाचा
Comments are closed.