मुंबई महापालिकेसाठी भाजप-शिवसेनेचं गणित ठरलं, 210 जागांवर एकमत, विश्वसनीय सुत्रांची माहिती
मुंबई महानगरपालिका निवडणूक: मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेना आणि भाजप युतीच्या जागावाटपावर मोठ्या प्रमाणात एकमत झाले आहे. जवळपास 210 जागांवर सहमती झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. मात्र, अजूनही 17 जागांवर तिढा कायम असल्याची माहिती एबीपी माझाला सूत्रांनी दिली आहे. हा उर्वरित तिढा सोडवण्यासाठी आज रंगशारदा येथे युतीची महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीला शिवसेनेकडून उदय सामंत, राहुल शेवाळे आणि मिलिंद देवरा उपस्थित राहणार आहेत. तर भाजपकडून आशिष शेलार, अमित साटम आणि प्रवीण दरेकर सहभागी होणार आहेत.
आजच उर्वरित 17 जागांचा तिढा सुटण्याची शक्यता
दरम्यान, आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत जागावाटपाच्या यादीवर शेवटचा हात फिरवण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आजच उर्वरित 17 जागांचा तिढा सुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता रंगशारदा येथील बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले असून, आजच जागांचा तिढा सुटणार का हे बघणं महत्त्वाचं राहणार आहे.
मुंबई महापालिकेच्या 227 जागांपैकी भाजप 140 जागांवर तर शिवसेना 87 जागांवर लढण्याची शक्यता
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांपासून भाजप (BJP) आणि शिवसेनेत (Shivsena) जागावाटपासाठी चर्चेच्या फेऱ्या सुरु आहेत. या चर्चेअंती आता भाजप आणि शिंदे सेनेच्या मुंबईतील जागावाटपाचा नवा फॉर्म्युला समोर आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, मुंबई महापालिका निवडणूक 2026 (Mumbai Election 2026) साठी महायुतीचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाला आहे. त्यानुसार मुंबई महापालिकेच्या 227 जागांपैकी भाजप 140 आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना 87 जागा लढवणार असल्याची माहिती मिळत आहे. या महापालिकेमध्ये महायुतीतील अजित पवारांची (Ajit Pawar) राष्ट्रवादी स्वतंत्र लढणार आहे. त्यामुळे भाजप आणि शिवसेना मिळून 227 जागा लढवणार आहेत. याबाबतची अधिकृत घोषणा आता कधी होणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. यापूर्वी जागावाटपाच्या पहिल्या बैठकीत भाजपने मुंबईत शिंदे गटासाठी (Shinde Camp) फक्त 52 जागा सोडण्याची तयारी दाखवली होती. मात्र, ठाकरे बंधूंच्या युतीनंतर भाजपने आता शिवसेनेला जास्त जागा देऊ केल्या हाेत्या. परंतु, जागावाटपच्या या सूत्रावर अधिकृतरित्या शिक्कामोर्तब कधी होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. जवळपास 210 जागांवर एकमत झाल्याची माहिती देखील मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या:
Pimpri Chinchwad Election : पिंपरीत आम्ही 128 पैकी 125 जागा जिंकणार, अजितदादांना फक्त तीनच जागा मिळणार; भाजप आमदाराचा मोठा दावा
आणखी वाचा
Comments are closed.