एक जागा, दोन इच्छुक उमेदवार; आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात मनसे अन् ठाकरे गटात चुरस

राज ठाकरे उद्धव ठाकरे बीएमसी निवडणूक 2026: संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या यंदाच्या निवडणुकीत ठाकरे बंधू आणि शिवसेना-भाजपच्या महायुतीपैकी कोणाची सरशी होणार, याची उत्सुकता सर्वांना आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी नुकतीच शिवसेना-मनसेच्या युतीची घोषणा केली होती. त्यानंतर आता शिवसेना ठाकरे गट आणि मनसेचा जागावाटपही झाले आहे. याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे.

मुंबईतील प्रभाग क्रमांक 194 वरून मनसेमध्ये नाराजी नाट्य सुरु आहे. प्रभाग क्रमांक 194 हा ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये शिवसेनेला सोडण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. या प्रभागामध्ये मनसेकडून संतोष धुरी निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. मात्र याच जागेवर ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे (Sunil Shinde) यांचे भाऊ निशिकांत शिंदे देखील इच्छुक आहेत. त्यामुळे ही जागा मनसेला मिळावी यासाठी मनसे नेते आग्रही असल्याची माहिती समोर येत आहे. (Shivsena UBT-MNS Yuti) दरम्यान, 2017 च्या निवडणुकीत 194 प्रभागातून शिवसेना शिंदे गटाचे समाधान सरवणकर निवडून आले होते.

राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त सभांचं नियोजन- (BMC Election Date 2026)

2 जानेवारीनंतर राज ठाकरे उद्धव ठाकरे यांची राज्यातील महापालिकांमध्ये संयुक्त सभा घेण्याचे नियोजन सुरु आहे. साधारणपणे 2 जानेवारीपासून 11 दिवसात सहा ते सात महापालिकांमध्ये राज ठाकरे उद्धव ठाकरे संयुक्त सभा घेणार असल्याची माहिती मिळत आहे. सर्व ठिकाणचे उमेदवार निश्चित झाल्यानंतर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे दोन जानेवारीनंतर पहिली संयुक्त सभा घेणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.  मुंबई, ठाणेकल्याण-डोंबिवली, नाशिक, पुणेमीरा-भाईंदर या ठिकाणी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे संयुक्त सभा घेणार असल्याचं सांगितलं जात आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकूण 227 प्रभागांसाठी मतदान- (BMC Election Date 2026)

आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून ओळख असणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेची निवडणूक जाहीर (BMC Election Date 2026) झाली आहे. मुंबईसह राज्यातील एकूण महापालिकांमध्ये 15 जानेवारी 2026 ला मतदान होणार आहे. तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होईल. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत एकूण 227 प्रभागांसाठी मतदान होणार आहे. मुंबई महापालिकेचा कार्यकाळ 7 मार्च, 2022 रोजी संपुष्टात आला. तेव्हापासून मुंबई महापालिकेवर प्रशासक आहे. मुंबई महानगरपालिकेची मागील निवडणूक 2017 रोजी झाली होती. यावेळी शिवसेनेच्या किशोरी पेडणेकर महापौर म्हणून कार्यरत होत्या.

मुंबई महानगपालिका 2026 साठी निवडणूक कार्यक्रम- (BMC Election Date 2026)

  1. नामनिर्देशन- 23 डिसेंबर ते 30 डिसेंबर
  2. नामनिर्देशन पत्राची छाननी- 31 डिसेंबर
  3. उमेदवार मागे घेणे- 2 जानेवारी 2026 पर्यंत
  4. अंतिम यादी आणि चिन्ह- 3 जानेवारी 2026
  5. मतदान- 15 जानेवारी 2026
  6. मतमोजणी/निकाल-16 जानेवारी 2026

2017 चे पक्षीय बलाबल- 227 नगरसेवक (Party Wise Corporator BMC 2017)

शिवसेना- 84
भाजप- 82
काँग्रेस- 31
राष्ट्रवादी काँग्रेस- 9
मनसे- 7
समाजवादी पक्ष- 6
एमआयएम- 2
अपक्ष- 5

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

संबंधित बातमी:

Raj Thackeray Uddhav Thackeray BMC Election 2026 मोठी बातमी: मुंबई मनपासाठी राज ठाकरेंचा पहिला मोहरा ठरला, पहिली उमेदवारी कुणाला?

आणखी वाचा

Comments are closed.