राज ठाकरेंच्या मनसेची हितेंद्र ठाकूरांच्या बविआशी युती, विरारमध्ये दोघेही शिट्टी चिन्हावर लढणार

मुंबई : एकीकडे मुंबईसह अनेक ठिकाणी ठाकरे बंधू एकत्र लढणार असल्याचं जाहीर झाल्यानंतर वसई विरारमध्ये मात्र चित्र काहीसं वेगळं आहे. वसई विरार महापालिकेमध्ये राज ठाकरे यांची मनसे आणि हितेंद्र ठाकूर यांची बहुजन विकास आघाडी (बहुजन विकास आघाडी) एकत्र लढणार आहेत. महत्त्वाचं म्हणजे मनसेचे उमेदवार हे बविआच्या शिट्टी या चिन्हावर लढणार आहेत. त्याचवेळी ठाकरेंची शिवसेना मात्र स्वतंत्र लढणार आहे.

मुंबईत ठाकरे बंधूंनी पत्रकार परिषद घेत अखेर राजकीय युती जाहीर केली आणि बहुतांश ठिकाणी एकत्र लढण्याचा निर्धारही केला. मात्र अवघ्या काही दिवसांतच त्याला पहिला सुरूंग वसई विरारमध्ये लागला. वसई विरारमध्ये दोन्ही ठाकरे बंधूंचे पक्ष वेगवेगळे लढणार आहेत. सोबत लढायचं असेल, भाजप-शिंदेंच्या शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवायचं असेल तर आमच्या चिन्हावर लढा अशी बविआची अट होती. मनसेने ती मान्य केली, मात्र ठाकरेंची शिवसेना वेगळी लढणार आहे.

Vasai Virar Election :  भाजपला रोखण्यासाठी एकत्र

मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी यावर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, जर वेगळे चिन्ह घेतले तर मी त्यासोबत जाईन. माझ्या कडून चिन्हाचा विषय झालेला आहे. आमचे पाच कार्यकर्ते जरी निवडून येत असतील तर त्यासाठी चिन्हाचा प्रश्न नाही, निवडून येणे महत्त्वाचे आहे.

ठाकरे गटाला माझी विनंती आहे, त्यांनी वेगळं लढू नये. भाजपला जर रोखायचं असेल तर एकत्र या. किती जागा येणार यापेक्षा भाजप जिंकणार का हे महत्वाचे आहे. ठाणेभिवंडी, मीरा भाईंदर, कल्याण डोंबिवली सगळीकडे जागावाटप पूर्ण झाले आहे. महाविकास आघाडी म्हणून आम्ही लढणार आहोत, काँग्रेस देखील सोबत आहे असं अविनाश जाधव म्हणाले.

वसई विरार महापालिकेत 29 प्रभाग असून, 115 सदस्य संख्या आहे. यापैकी 58 जागा महिलांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. तर 57 जागा पुरुषांसाठी राखीव आहेत. अनुसूचित जाती (एस.सी.) आणि अनुसूचीत जमाती (एस.टी.) साठी प्रत्येकी साठी 5 आरक्षण आहेत. तर यात प्रत्येकी 2 महिलांसाठी आरक्षण ठेवण्यात आले आहेत. तसेच 74 जागा या सर्वसाधारण प्रवर्गाकरीता राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

वसई विरार महानगरपालिका निवडणूक वसई-विरार महानगरपालिका बलाबल

एकूण जागा – 115

बहुजन विकास आघाडी (BVA) – 106 जागा

भारतीय जनता पक्ष (भाजप)- १ जागा

काँग्रेस (INC) – 0 जागा

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (राष्ट्रवादी) – 0 जागा

शिवसेना – 5 जागा

इतर / अपक्ष – 3 जागा

ही बातमी वाचा:

आणखी वाचा

Comments are closed.