शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं मुंबई महापालिकेसाठी काँग्रेससोबतची चर्चा थांबवली, कारण समोर
BMC निवडणूक मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं मुंबई महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेससोबतच्या आघाडीची चर्चा थांबवली आहे. काँग्रेसकडे पक्षानं 29 जागा शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं मागणी केली होती. काँग्रेस वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चा करत असल्यानं राष्ट्रवादीची चर्चा पुढं जात नव्हती. आता वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेस एकत्र येण्याबाबत उद्या घोषणा करु शकतात. काँग्रेसनं त्यामुळं शरद पवारांच्या राष्ट्रवादीला ज्या जागा सोडायच्या होत्या त्यासंदर्भात नकारात्मकता दर्शवली आहे.
NCPSP : शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं काँग्रेसोबतची चर्चा थांबवली
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत काँग्रेसनं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षासोबत जाणार नसल्याचं सांगितलं आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उद्धव ठाकरेंसोबत चर्चा सुरु आहे. राष्ट्रवादीच्या वतीनं माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडून उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा केली जात आहे. ठाकरेंच्या शिवसेनेकडून शरद पवारांच्या राष्ट्रवादीला 12-13 जागा मिळू शकतात, अशी प्राथमिक माहिती समोर येताना दिसत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने काँग्रेस सोबतची चर्चा थांबवली असल्याची पक्षाचे युवक राष्ट्रीय अध्यक्ष फहाद अहमद यांनी माहिती दिली. उद्या काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीची एकत्रित येण्याबाबतची घोषणा होण्याची दाट शक्यता आहे. जागा वाटपावरून काँग्रेस सोबत सूत जुळत नसल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उद्धव ठाकरेंच्या सेनेकडेच जागा मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. काँग्रेस सोबतची चर्चा थांबवत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवकचे राष्ट्रीय अध्यक्ष फहाद अहमद यांच्याकडून देण्यात आली आहे.
नुकतीच काँग्रेस सोबत बैठक शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांची पार पडली त्यानंतर पक्षाचा निर्णय झाल्याची फहाद अहमद यांच्याकडून माहिती देण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी काल उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. आता शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचं आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं जागावाटपाचं गणित जुळणार का ते पाहावं लागेल.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी आज दुपारी आम्ही पहिल्यापासूनच महाविकास आघाडी म्हणून राज्यात चालण्याचा प्रयत्न केला असल्याचं म्हटलं. मनसे आल्याने काँग्रेस थोडी दूर गेली आहे. मुंबई, नवी मुंबईठाणे अशा प्रत्येक ठिकाणी चर्चा सुरू आहेत. संजय राऊत यांनी पुढाकार घेतला तर मुंबईत सुद्धा यातील मार्ग निघू शकतो. काही ठिकाणी आमच्या 100% जागा निवडून येणार होत्या, मात्र तरी देखील आम्ही मागे पुढे सरकलो आहे. जर मोठा भाऊ म्हणून आम्हाला मदत करण्याची भूमिका घेतली, तर ही युती चांगल्या प्रकारे टिकून राहील, असं शशिकांत शिंदे म्हणाले.
आणखी वाचा
Comments are closed.