एकनाथ शिंदेंकडून 60 माजी नगरसेवकांना संधी, शिवसेनेची लवकरच यादी; प्रकाश महाजनांनाही जबाबदारी

मुंबई : महापालिका निवडणुकांसाठी (BMC election) उमेदवारी अर्ज भरण्यास अवघे दोन दिवस उरले असून राजकीय पक्षांकडून आज महायुती व महाविकास आघाडीवर शिक्कामोर्तब होणार आहे. मुंबई महापालिकेसाठी काँग्रेस आणि वंचितची आघाडी जाहीर झाली असून दुसरीकडे शरदचंद्र पवार पक्षाची राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्यात आघाडी होण्याची शक्यता आहे. तर महायुती (Mahayuti) म्हणून भाजप आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना निवडणूक लढणार आहे. उपमुख्यमंत्री मराठी (एकनाथ शिंदे) यांनीही राजकीय डावपेच आखायला सुरुवात केली असून नुकतेच त्यांनी मनसेच्या प्रकाश महाजन यांना आपल्या पक्षात घेतले आहे. तर, आज ते मुंबईतील माजी नगरसेवकांशी संवाद साधणार आहेत.

शिवसेनेत प्रवेश केलेल्या प्रकाश महाजन यांना एकनाथ शिंदेंनी महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. छत्रपती संभाजी नगरमधील प्रकाश महाजन यांनी दोनच दिवसापूर्वी मनसेची साथ सोडून शिवसेनेत प्रवेश केला होता. आता, शिवसेनेत प्रवेश केलेल्या प्रकाश महाजन यांना पक्षाकडून प्रवक्तेपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. दरम्यान, मनसेतही महाजन यांच्यावर प्रवक्तेपदाची जबाबदारी देण्यात आली होती. तसेच, एकनाथ शिंदे आज मुंबईतील 60 माजी नगरसेवकांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करणार आहेत.

शिवसेना युबीटी आणि इतर पक्षातून शिवसेना शिंदे गटात आलेल्या 60 माजी नगरसेवकांना एकनाथ शिंदेनी बोलावलं आहे. त्यामध्ये, 2017 सालचे 39 आणि इतर पक्षांचे 21 मिळून सध्या 60 माजीनगरसेवकांची फौज एकनाथ शिंदेंकडे आहे. एकनाथ शिंदेनी या 60 माजी नगरसेवकांचं तिकिट फायनल केल्याची माहिती आहे. त्यानुसार, नंदनवन या निवासस्थानी आज या सर्व माजी नगरसेवकांना एकनाथ शिंदे कानमंत्र देणार आहेत. त्यामुळे, एकनाथ शिंदेनी माजी नगरसेवकांचा आत्मविश्वास सार्थ ठरवल्याचं दिसून येत आहे. जवळपास युबीटी मधून आणि इतर पक्षातून आलेल्या सर्वच माजी नगरसेवकांना तिकीट फायनल करण्यात आलं आहे. मुंबईतील नगरसेवकांसोबत आज एकनाथ शिंदे संवाद साधणार आहेत, दुपारी 4 वा मुंबईतील सर्व माजी नगरसेवकांना शिंदेंकडून नंदनवन येथे उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या बैठकीत निवडणुकांच्या नियोजनासह काही उमेदवारांना AB फॉर्म वाटले जाऊ शकतात. नगरसेवकांना येताना उमेदवारी संदर्भातील कागदपत्रे घेऊन बोलवण्यात आलं आहे.

महायुतीतील 207 जागांचे वाटप निश्चित

दरम्यान, मुंबई महापालिकेसाठी महायुतीचं 207 जागांवर निश्चित झालं असून भाजप 128 तर शिवसेना 79 जागांवर निवडणूक लढणार आहे. उर्वरीत 20 जागांसाठीची बोलणी अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे, आज रात्री उशिरा किंवा उद्यापर्यंत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा

मोठी बातमी : मुंबईत काँग्रेस-वंचितकडून आघाडीची घोषणा, वंचित 62 जागांवर लढणार, काँग्रेस किती जागांवर लढणार?

आणखी वाचा

Comments are closed.