लाडकी बहीणच्या ई- केवायसी प्रक्रियेसाठी काही दिवस शिल्लक, आदिती तटकरेंचं महत्त्वाचं आवाहन
मुंबई : महाराष्ट्र सरकारच्या महिला व बालविकास विभागाकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली जाते. या योजनेतील सर्व पात्र महिला लाभार्थ्यांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. लाडकी बहीण योजनेचा लाभ पात्र महिलांपर्यंत पोहोचावा यासाठी ई-केवायसी प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सर्व पात्र महिलांनी 31 डिसेंबरपर्यंत ई-केवायसी करुन घ्यावी, असं आवाहन केलं आहे.
Aditi Tatkare: आदिती तटकरेंचं लाडक्या बहिणींना आवाहन
महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडक्या बहिणींना आवाहन करत म्हटलं की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी E-Kyc प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी 31 डिसेंबर 2025 ही अंतिम तारीख असून, आता केवळ शेवटचे 4 दिवस उरले आहेत. सर्व लाडक्या बहिणींनी आजच आपली E-Kyc प्रक्रिया पूर्ण करावी अशी विनंती देखील आदिती तटकरे यांनी केली आहे.
लाडक्या बहिणींना पहिल्यांदा 18 नोव्हेंबरपर्यंत ई केवायसी करुन घेण्यास सांगण्यात आलं आहेत. त्यानंतर एकदा मुदतवाढ देत ई केवायसी 31 डिसेंबरपर्यंत करुन घ्यावं, असं आवाहन आदिती तटकरे यांनी केलं होतं. याशिवाय ज्या महिलांकडून ई केवायसी करताना काही चुकीचे पर्याय निवडले गेले असतील तर दुरुस्त करण्यासाठी देखील केवळ एक संधी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ई केवायसी दुरुस्ती देखील 31 डिसेंबरपर्यंत करता येणार आहे.
नोव्हेंबर- डिसेंबरच्या हप्त्याची प्रतीक्षा
महाराष्ट्रातील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना ऑक्टोबर महिन्याच्या 1500 रुपयांचा हप्ता 3 आणि 4 नोव्हेंबर रोजी देण्यात आला होता. त्यानंतर लाडक्या बहिणींना नोव्हेंबर महिन्याची हप्त्याची रक्कम मिळालेली नाही. आता डिसेंबर महिना देखील संपत आला आहे. त्यामुळं लाडक्या बहिणींची एकीकडे ई- केवायसी पूर्ण करण्यासाठी धडपड सुरु आहे. तर, दुसरीकडे नोव्हेंबर आणि डिसेंबरच्या हप्त्याची देखील त्यांना प्रतीक्षा आहे.
महिला व बालविकास विभागाच्या मंत्री आदिती तटकरे यांनी महाराष्ट्राच्या विधिमंडळ अधिवेशनात विधानसभेत बोलताना 10 डिसेंबरला दिलेल्या माहितीनुसार त्यावेळी 1 कोटी 74 लाख महिलांनी ई केवायसी प्रक्रिया पूर्ण केली होती.
दरम्यान, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. तर, ज्या महिला शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा लाभ घेतात, त्यांना लाडकी बहीण मधून 500 रुपये दिले जातात.
लाडक्या बहिणींनो…
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ अखंडपणे सुरू ठेवण्यासाठी E-Kyc प्रक्रिया पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. यासाठी ३१ डिसेंबर २०२५ ही अंतिम तारीख असून, आता केवळ शेवटचे ४ दिवस उरले आहेत.
सर्व लाडक्या बहिणींनी आजच आपली E-Kyc प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र… pic.twitter.com/LMxMlLqlsV
— अदिती एस तटकरे (@iAditiTatkare) 27 डिसेंबर 2025
आणखी वाचा
Comments are closed.