मुंबईत शरद पवारांची ठाकरे बंधूंना साथ; राष्ट्रवादीचं अखेर ठरलं, तुतारी किती जागांवर लढणार?
मुंबई महानगरपालिका निवडणूक: महानगरपालिका निवडणुकीच्या (Mahanagar palika election 2026) पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महापालिका निवडणुकीसाठी ठाकरे बुंधुंची युती (Thackeray brothers alliance) झाल्यानंतर त्यांच्यासोबत महाविकास आघाडीचे पक्ष जाणार का? असा सवाल उपस्थित केला जात होता. अशातच अखेर मुंबई महापालिका निवडणूकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाने (Nationalist Congress Party Sharadchandra Pawar) ठाकरे बंधुंबरोबर युती केली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला उबाठा मनसे यूतीकडून 10 जागा देण्यात आल्या आहेत. कोणत्याही क्षणी राष्ट्रवादीच्या उमेदवारांची यादी जाहीर होण्याची शक्यता आहे.
52 जागांच्या मागणीचा प्रवास अखेर 10 जागांवर येऊन संपला
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा 52 जागांच्या मागणीचा प्रवास अखेर 10 जागांवर येऊन संपला आहे. त्यामुळं आता मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत ठाकरे बंधूबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष देखील सहभागी असणार आहे. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष मुंबईत कोणाबरोबर जणार याबाबतची चर्चा सुरु होती. अखेर हा मुद्दा निकाली निघाला आहे. शरद पवार यांच्या पक्षाची ठाके बंधूंबरोबर युती झालेली आहे. त्यामुळं आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना ठाकरे गटाच्या मदतीला शरद पवारांचा पक्ष आला आहे. त्यामुळं मुंबईत ठाकरे बंधूंना बळ मिळणार असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, राष्टरवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने काँग्रेस पक्षाबरोबर देखील चर्चा केली होती. मात्र, त्यांच्यासोबत जाण्यासंदर्भात काही निर्णय झाला नाही. त्यानंतर अखेर ठाकरे बंधूबरोबर युती झाल्याची माहिती मिळत आहे.
उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात, 2 जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत
राज्यात महापालिका निवडणुकांसाठी (Maharashtra Municipal Corporation Election 2026) राजकीय वातावरण तापलं आहे. 29 महापालिकेसाठी 23 डिसेंबर पासून अर्ज भरण्यास सुरूवात झाली आहे. 30 डिसेंबरपर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे. त्यामुळं अर्ज भरण्यास बाकी दोन दिवसच उरले आहेत. अर्जांची छाननी 31 डिसेंबरला होईल. 2 जानेवारीपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. निवडणूक चिन्हांचं वाटप, अंतिम उमेदवारांची यादी 3 जानेवारीला प्रसिद्ध होईल. सर्व 29 महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान होईल तर 16 जानेवारीला मतमोजणी होणार आहे. निवडणुकांना अवघे 18 दिवस बाकी आहेत, मात्र अजूनही जागावाटपावरुन काही पक्षांमध्ये चर्चा सुरु आहे. शिवसेना आणि भाजप यांच्यातही चर्चा सुरु असल्याची माहिती मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या:
Nashik Election 2026: नाशिकमध्ये महायुतीत जागा वाटपाचे भिजत घोंगडे; कार्यकर्त्यांचीही घालमेल, गिरीश महाजन शिवसेना अन् राष्ट्रवादीच्या नेत्यांशी चर्चा करणार
आणखी वाचा
Comments are closed.