मोठी बातमी! भाजकडून पहिला अर्ज तेजस्वी घोसाळकरांचा, उच्चभ्रू मलबार हिलमधूनही 4 उमेदवार जाहीर
मुंबई : अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागेल्या मुंबई महानगरपालिका (BMC निवडणूक) निवडणुकांसाठी उमेदवारांची नावे आता समोर येण्यास सुरुवात झाली असून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 37 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. तर दुसरीकडे भाजपकडून चार उमेदवारांच्या नावाची घोषणा झाली असून हे चारही उमेदवार उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामध्ये, नुकतेच शिवसेना उबाठा पक्षातून भाजपमध्ये (BJP) प्रवेश केलेल्या तेजस्वी घोसाळकर (Tejaswi ghosalkar) यांचाही उमेदवारी अर्ज उद्या भरला जाणार आहे. दहिसर-वॉर्ड क्रमांक 2 मधून त्यांचा उमेदवारी अर्ज भरला जाणार असून रॅली काढत शक्तिप्रदर्शनही केलं जाईल.
आगामी मुंबई महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर आता कोणत्याही क्षणी महायुती आणि ठाकरे बंधूंकडून उमेदवारांची यादी प्रसिद्ध केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्षांमधील इच्छूक उमेदवार अंतिम यादीकडे आणि एबी फॉर्मकडे डोळे लावून बसले आहेत. भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना मुंबईत एकत्र निवडणूक लढवणार आहेत. या दोघांनी जागावाटपाचे सूत्र जवळपास निश्चित केले असले तरी भाजपने अद्याप मुंबईतील उमेदवारांची अधिकृतपणे यादी जाहीर केली नाही. मात्र, काही उमेदवारांनी स्वत:च्या सोशल मिडिया अकाऊंटवरुन उमेदवारी अर्ज दाखल करत असल्याची माहिती दिली. त्यामध्ये, दहिसर-वॉर्ड क्रमांक 2 मधून मी उद्या उमेदवारी अर्ज भरणार आहे. त्यानिमित्त आयोजित भव्य रॅलीमध्ये आपण सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,ही नम्र विनंती, असे ट्विट तेजस्वी घोसाळकर यांनी केले आहे. यासह भाजपाकडून आणखी तीन उमेदवारांचे नाव निश्चित झाले आहेत.
दहिसर- वॉर्ड क्रमांक २ मधून मी उद्या उमेदवारी अर्ज भरणार आहे. त्यानिमित्त आयोजित भव्य रॅलीमध्ये आपण सर्वांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, ही नम्र विनंती.
दहिसरच्या न्याय आणि प्रगतीसाठी आपले आशीर्वाद आणि साथ मोलाची आहे. तरी आपण सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहा ही नम्र… pic.twitter.com/JkZGbufISJ
— तेजस्वी अभिषेक घोसाळकर (@tejasvee27) 28 डिसेंबर 2025
मलबार हिल मतदारसंघातून 4 उमेदवार निश्चित
मुंबई महापालिकेसाठी भाजपकडून मलबार हिल मतदारसंघातील चार नावं निश्चित झाली आहेत. वॉर्ड 215 संतोष ढाले, 218 स्नेहल तेंडुलकर, 214 मधून अजय पाटील तर 219 मधून सन्नी सानप उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. उद्या चारही भाजपचे उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.