सोलापुरात भाजपने वेळेत एबी फॉर्म भरले नाहीत, काँग्रेससह ठाकरे गटाची निवडणूक आयोगाकडे तक्रार
सोलापूर : राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे शेवटच्या दिवशी आपापल्या पक्षाकडून एबी फॉर्म घेऊन उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सर्वपक्षीय उमेदवारांची झुंबड उडताना दिसली. दरम्यान, या अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी सोलापुरात गोंधळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं. सोलापुरात काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे आणि शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख अजय दासरी यांची निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत भाजपने वेळेत एबी फॉर्म भरले नसल्याची तक्रार खासदार प्रणिती शिंदे आणि ठाकरे गटानं केली आहे.
दुपारी तीन वाजेपर्यंत मुदत असताना भाजपने तीन वाजून पाच मिनिटांनी एबी फॉर्म दिल्याची तक्रार
दरम्यान, दुपारी तीन वाजेपर्यंत मुदत असताना भाजपने तीन वाजून पाच मिनिटांनी एबी फॉर्म दिल्याची तक्रार काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे आणि ठाकरे गटानं केली आहे. दरम्यान भाजपने याप्रकरणी आपली बाजू मांडलेली असून आम्ही एबी फॉर्म आधीच जमा केले असून केवळ पोहोच घेण्यासाठी आलो होतो असा दावा केला होता. या प्रकरणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अद्याप कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नसून निर्णय अधिकारी काय अहवाल देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सोलापुरात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या निवडणूक प्रमुखाचा राजीनामा दिला आहे.
सोलापुरात राष्ट्रवादी अजित पवार गटाला मोठा धक्का बसला आहे. निवडणूक प्रमुख सुधीर खरटमल यांनी राजीनामा दिला आहे. निवडणूकीपूर्वी सुधीर खरटमल यांनी शरद पवार गटाच्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन अजित पवार गटात आले होते. अजित पवार गटात आल्यानंतर त्यांना निवडणूक प्रमुख पदाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र खरटमल यांनी ऐन निवडणुकीत पक्षाचा आणि निवडणूक प्रमुख पदाचा ही राजीनामा दिला आहे. हा अजित पवार गटाला मोठा धक्का मानला जात आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस
राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे शेवटच्या दिवशी आपापल्या पक्षाकडून एबी फॉर्म घेऊन उमेदवारी अर्ज भरण्यासाठी सर्वपक्षीय उमेदवारांची झुंबड उडताना दिसली. पुणेमुंबई, छत्रपती संभाजीनगर, लातूर या महानगरपालिकांमध्ये उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी हायव्होल्टेज राजकीय ड्रामा पाहायला मिळाला. आता 2 जानेवारीपर्यंत उमेदवारांना अर्ज माघारी घेता येणार आहेत. त्यानंतर 15 जानेवारीला मतदान होणार असून 16 जानेवारीला एकाच दिवशी 29 महानगरपालिकांमध्ये मतमोजणी होऊन निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे.
आणखी वाचा
Comments are closed.