मुंबईत वंचितमुळे काँग्रेसची गोची, 16 ठिकाणी उमेदवारच नाहीत, भाजपला पूरक भूमिका? मोकळे म्हणाले..

मुंबई : राज्याचं लक्ष लागलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत (BMC Election) ठाकरे बंधू एकत्र आले असून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानेही युतीत सहभाग घेतला आहे. तर, शिवसेना-भाजप युती असून अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र लढत आहे. येथे काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीला (VBA) सोबत घेतले असून आठवलेंचा रिपाइं आणि समाजावादी पक्षही मैदानात आहे. मुंबईबाई). महापालिकेसाठी अर्ज भरण्याची शेवटची मुदत काल 30 डिसेंबर रोजी संपुष्टात आली. त्यामुळे, शेवटच्या दिवशी चांगल्याच नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. त्यामध्ये, काँग्रेससोबत आघाडी केल्यानंतर 62 जागा घेतलेल्या वंचित बहुजन आघाडीने 21 प्रभागात 21 उमेदवार दिले नसल्याचे शिवसेना प्रवक्ते संजय निरुपम यांनी म्हटले होते. आता, वंचितकडून यावर स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. तसेच, 21 नसून 16 जागांवर वंचित उमेदवार देऊ शकले नाही, असेही वंचिकडून स्पष्ट करण्यात आलंय.

काँग्रेसने वंचित बहुजन आघाडीला मुंबईमध्ये 62 जागा दिल्या आणि जेव्हा अर्ज भरायला 24 तास राहिले तेव्हा वंचित बहुजन आघाडीने सांगितले की, आमच्याकडे 21 ठिकाणी उमेदवारच नाहीत. त्या 21 प्रभागाची यादी मी ट्विट केली आहे, आता काँग्रेसला सुद्धा प्रश्न समोर राहिला की आता हे 21 उमेदवार आम्ही कुठून आणायचे. त्यामुळे काँग्रेससुद्धा या 21 ठिकाणी आपले उमेदवार उभे करू शकली नाही. आता यामध्ये 21 ठिकाणी भाजपचे उमेदवार आहेत, कारण संख्या त्यांची जास्त आहे. 137 ठिकाणी ते निवडणूक लढवत आहेत, तर 90 ठिकाणी आम्ही निवडणूक लढवतोय, अशी माहिती संजय निरुपम यांनी दिली. त्यानंतर, आता वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी घडल्या प्रकाराबाबत माहिती दिली.

मुंबईत आम्ही 21 नाही, तर 16 ठिकाणी उमेदवार देऊ शकलो नाही. 5 उमेदवार आम्ही दिले, 16 जागा आम्ही काँग्रेसला परत केल्या आहेत. मध्यरात्री अडीचच्या दरम्यान आम्हाला लक्षात आलं 21 ठिकाणी आम्ही उमेदवार देऊ शकलो नाही. मात्र, सकाळपर्यंत 5 उमेदवार आल्यामुळे आम्ही 16 ठिकाणी उमेदवार नाही देऊ शकलो, असे वंचित बहुजन आघाडीचे सिद्धार्थ मोकळे यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले. तसेच, काँग्रेसला आम्ही जागा दिल्या, आमच्यात व्यवस्थित सुसंवाद सुरू होता. त्यामुळे, फायदा कोणाला किंवा भाजपच्या उमेदवाराच्या ठिकाणी वंचितने जागा सोडली का हे तुम्ही तपासा, असेही मोकळे यांनी म्हटले.

प्रश्न: निवडणुका सुरू होण्यापूर्वी तुम्ही मुलाखती घेऊन कोणते वॉर्ड लढायचे हे ठरवले असेल आणि तशी यादी तयार केली असेल तरीदेखील उमेदवारी अर्ज भरायच्या शेवटच्या दिवशी आपल्या लक्षात येत की 21 ठिकाणी आपल्याकडे उमेदवारच नाही?

उत्तर – आम्ही मुलाखती घेऊन वॉर्ड फायनल केले होते. ७० जागा आम्ही ठरवल्या होत्या. २० आमच्या जागा अशा होत्या तिथ आम्ही सहकार्य करायलायच तयार नव्हतो. बाकी जागांवर आम्ही चर्चा करत होतो. शेवटपर्यंत चर्चा पूर्ण झाल्या नाहीत त्यामुळे लक्षात आलं नाही. १६ ठिकाणी काही उमेदवार चुकीचे आले होते त्यांना तिकीट द्यायला आम्ही नकार दिला आणि आम्ही काँग्रेसला जागा परत केल्या

प्रश्न: १६ ठिकाणी उमेदवार नाहीत हे लक्षात आलं नाही पक्षाकडून निष्काळजीपणा झाला आहे असं वाटत नाही का?
उत्तर – २० जागा आमच्याकडे सक्षम उमेदवार होते. ५० जागा राहिलेल्या आहेत तिथ देखील उमेदवार आमच्याकडे होते मात्र आम्ही ज्या जागा मागत होतो त्या सगळ्याच युती आघाडी मधे मिळतील असं नाही.

प्रश्न: तुम्हाला भाजपची बी टीम म्हणतात. आता तुम्ही उमेदवार ज्याठिकाणी दिले नाही तिथ भाजपचे उमेदवार आहेत?
उत्तर- काँग्रेसला आम्ही जिंकलेला जागा दिल्या त्यासोबत दोन नंबरला असणाऱ्या जागा देखील आम्ही दिलेल्या आहेत. आम्ही भाजपला बाय दिलेली नाही. आम्हाला काही ठिकाणी तांत्रिक अडचणींमुळे उमेदवार देता आले नाहीत. काही ठिकाणी चुकीचे उमेदवार होते ते आम्हाला द्यायचे नव्हते. सर्व इच्छुकांना आम्ही संधी देऊ शकता नव्हतो. आमचे कर्मचारी ३ दिवस घरी गेले नव्हते त्यामुळे त्यांना जास्त त्रास देणे योग्य वाटलं नाही. त्यामुळे, आम्हाला डेटा लवकर मिळाला नाही.

हेही वाचा

कल्याण डोंबिवलीत भाजपची हॅट्रिक, तिसरा विजय; बहुमताच्या आकड्यापासून अवघ्या 58 जागा दूर

आणखी वाचा

Comments are closed.