मुंबईत ठाकरेंचं विजयाचं गणित ठरलं? तब्बल चार तास बंद दाराआड खलबतं, नेमकी काय झाली चर्चा?

मुंबई : महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. काही ठिकाणी युत्या तर काही ठिकाणी आघाड्या झाल्या आहेत. तर कुठं स्वबळाचा नारा देण्यात आला आहे. दरम्यान, काही महानगरपालिकांमध्ये काहीजण बिनविरोध देखील निवडून गेले आहेत. दरम्यान, मुंबईत महापालिकेची निवडणूक सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. या निवडणुकीसाठी दोन ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात बैठक पार पडली. या ठाकरे बंधुंमध्ये तब्बल चार तास बैठक चालली.

चार तासात वचननामा, सभा, रॅली आणि निवडणूक प्रचार गाण्याबाबत चर्चा

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात आज तब्बल चार तास चर्चा झाली आहे. या चार तासात वचननामा, सभा, रॅली आणि निवडणूक प्रचार गाण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. उद्या निवडणूक अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने ठाकरेंच्या युतीत जर कोणी बंडखोर असतील तर त्याकडे स्थानिक पातळीवरवलक्ष देण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती आहे.

मुंबईत उद्धव ठाकरे यांची शिवसेना 164 जागांवर आणि मनसे 53 जागांवर निवडणूक लढवत आहे. मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या बंधूंनी पहिल्यांदाच एकत्र येऊन महायुती आणि काँग्रेससमोर मोठे आव्हान उभे केले आहे. या युतीमध्ये शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचाही (SP) समावेश झाला असून, मनसेने आपल्या वाट्याला आलेल्या 53 जागांसाठी उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली आहे.

एकनाथ शिंदे यांची शिवसेना मुंबईत 227 पैकी 91 जागा लढवणार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना मुंबईत 227 पैकी 91 जागा (BMC Election 2026) लढवणार आहे. शिवसेना आणि भाजपची युती आहे. त्यामुळे युतीच्या फॉर्म्युल्यानुसार भाजप 137 जागा लढवत असल्याने, शिंदेंच्या वाट्याला 91 जागा आल्या आहेत. एकनाथ शिंदेंच्या वाट्याला नेमके कोणते वॉर्ड आलेत, कोणत्या वॉर्डमध्ये कोणता उमेदवार आहे, याबाबतचं चित्र अद्याप स्पष्ट झालं नव्हतं. मात्र आता ही संपूर्ण यादी जाहीर करण्यात आली आहे.

मुंबई महा पालिकेसासाठी कोणत्या पक्षाचे किती उमेदवार?

भाजप – 137
शिवसेना (एकनाथ शिंदे) – ९०
राष्ट्रवादी (एपी) – 94
शिवसेना (उद्धव ठाकरे) – 163
मनसे – 53
राष्ट्रवादी (शरद पवार) – 11
काँग्रेस – 139
वंचित – 62
रासप – 10
रिपाई आठवले – 39

महत्वाच्या बातम्या:

मुंबई महापालिकेसाठी ठाकरे विरुद्ध शिंदे सेना; सदा सरवणकरांच्या मुलीला तिकीट, जोगेश्वरीत कुणाला संधी?

आणखी वाचा

Comments are closed.