निवृत्त IPS अधिकाऱ्याला 8 कोटींना गंडवले, मिरा रोड भाजप पदाधिकाऱ्यावर संशय, चौकशी सुरू

ठाणे : पंजाब पोलिसामधील निवृत्त आयपीएस अधिकारी अमर सिंह चहल (Amar Singh Chahal IPS) यांची फसवणूक प्रकरणात मिरा रोड भाजपच्या पदाधिकाऱ्यावर संशय व्यक्त केला जात आहे. पंजाब पोलिसांची टीम मिरा रोडमध्ये पोहोचली असून त्यांची भाजप पदाधिकारी शेरा ठाकूर आणि त्याच्या साथिदारांची चौकशी केली आहे. शेरा ठाकूर (Shera Thakur BJP) यानेच आठ कोटी फसवणूक केल्याने अमर सिंग चहल यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे.

पंजाब पोलीस दलातील माजी सेवानिवृत्त अधिकारी अमर सिंह चहल यांची प्रकृती अत्यवस्थ असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर समोर आलेल्या मोठ्या सायबर फसवणूक प्रकरणामुळे देशभरात खळबळ उडाली आहे.

Mira Bhayandar Cyber Fraud : भाजप पदाधिकाऱ्यावर संशय

या प्रकरणात मिरा-भाईंदर येथील भाजप पदाधिकारी शेरा ठाकूर आणि त्याच्या साथीदारांवर मोठ्या प्रमाणावर सायबर फसवणूक केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या संदर्भात तपासासाठी पंजाब पोलीस महाराष्ट्रात दाखल झाले असून, नवघर पोलीस ठाण्यात चौकशी सुरू आहे. तपासादरम्यान काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.

Online Fraud Racket Maharashtra : खात्यावर कोट्यवधींचे संशयास्पद व्यवहार

तपास यंत्रणांना मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शेरा ठाकूर आणि संबंधित पदाधिकाऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये कोट्यवधी रुपयांचे संशयास्पद आर्थिक व्यवहार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या प्रकरणात शेरा ठाकूरचा एक जवळचा साथीदार ताब्यात असून, याच टोळीत ‘पांडे’ नावाचा कुख्यात बुकीही सहभागी असल्याची माहिती समोर आली आहे. पांडे हा यापूर्वीही सट्टेबाजी प्रकरणात संशयित राहिलेला आहे.

दरम्यान, मिरा-भाईंदर परिसरात क्रिकेट सट्टा आणि इतर बेकायदेशीर जुगार चालवल्याचे धागेदोरे या प्रकरणाशी जोडले जात आहेत. आर्थिक व्यवहार, डिजिटल पुरावे आणि बँक खात्यांचा सखोल तपास सुरू असून, आगामी काळात आणखी मोठी कारवाई होण्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे.

या संपूर्ण प्रकरणावर राजकीय प्रतिक्रिया देखील उमटू लागल्या आहेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी शेरा ठाकूर हा आरोपी नरेंद्र मेहता यांच्या भावाचा व्यावसायिक भागीदार असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे हे प्रकरण आणखी गंभीर व संवेदनशील बनले आहे.

ही बातमी वाचा:

आणखी वाचा

Comments are closed.