आधी फॉर्म गिळल्याचा आरोप; नंतर शिंदेंनी खडसावलं, नाट्यमय घडामोडीनंतर आज उद्धव कांबळेंनी आपला उम
पुणे: पुण्यातील शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवार ज्यांच्यावरती फार्म गिळल्याचा आरोप झालेला ते उद्धव कांबळे यांनी प्रभाग क्रमांक 36 मधून आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलेला आहे. उद्धव कांबळे यांच्यावरती प्रतिस्पर्धी उमेदवाराचा एबी फॉर्म गिळल्याचा आरोप करण्यात आला होता, प्रभाग क्रमांक 36 मधून ते इच्छुक उमेदवार होते. त्यांनी शिवसेना शिंदे गटाकडून उमेदवारी अर्ज देखील भरला होता. मात्र काल पुण्याच्या राजकारणात जे नाराजी नाट्य रंगलं त्यावरून शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी उद्धव कांबळे यांना खडसावलं देखील होतं, त्यानंतर आता उद्धव कांबळे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. यामुळे त्यांच्या प्रभागामध्ये खळबळ उडाली आहे.
Shivsena Pune : एबी फॉर्म गिळल्याचा आरोप असलेल्या उद्धव कांबळेंना एकनाथ शिंदेंनी खडसावलेलं
एबी फॉर्म गिळल्याचा आरोप असलेला एकनाथ शिंदेंच्या पक्षाचा पुण्यातील उमेदवार उद्धव कांबळेने आपल्या हातून अनावधानाने हा प्रकार घडल्याचं म्हटलं होतं. पक्षाने आपल्यालाच उमेदवारी दिली असून मच्छिंद्र ढवळे या प्रतिस्पर्धी उमेदवाराने एबी फॉर्म चोरल्याचा त्यांनी दावा केला होता. मच्छिंद्र ढवळे यांनी एबी फॉर्म भरल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी आपल्यापासून लपवल्याने आपल्याला राग आल्याने आपण एबी फॉर्म फाडल्याचं उद्धव कांबळेंनी म्हटलं होतं.
Shivsena Pune News: मी AB फॉर्म खाल्ला नाही तर… स्पष्टीकरण देताना म्हटलेलं
या सर्व घटनेनंतर स्वत: उद्धव कांबळे पोलीस ठाण्यात हजर झाले होते. त्यांनी एबी फॉर्म फाडण्यामागची सर्व घटना एबीपी माझाशी बोलताना सांगितली आहे. त्यांनी अर्ज फाडल्याचं कबुल केलं आहे. मात्र आपण फॉर्म खाल्ला नाही, असं त्यांनी म्हटलं आहे. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली. घडलेल्या घटनेबद्दल बोलताना उद्धव कांबळे म्हणाले, माध्यमांमध्ये ज्या बातम्या आल्या आहेत की, मी फॉर्म गिळला, खाल्ला, वगैरे. पण तसं काही झालेलं नाही. मी फॉर्म खाल्ला नाहीये. मी जेव्हा फॉर्म भरला. त्यानंतर मला समजलं की तिथे अर्जाची छाननी सुरू आहे आणि तिथे मच्छिंद्र ढवळे यांनी आमच्या पक्षाकडून फॉर्म भरल्याचं समजलं. त्यांना मी व्यक्तीश: ढवळेंना ओळखत नाही. त्यांचा पक्षाशी कोणताही काही संबंधही नाही, त्यांनी कुठून तरी एबी फॉर्म मिळवला आणि तिकडे सबमीट केला आहे. परंतु मी वरिष्ठांना विचारलं, तेव्हा त्यांनी मीच अधिकृत उमेदवार असल्याचं मला सांगितलं. तसं पत्रही त्यांनी निवडणूक आयोगाला दिलं. जेव्हा मला प्रकार समजला तेव्हा मी कार्यालयात पोहोचलो. भावनेच्या भरात तो माझ्याकडून फाटला गेला आहे. मी ते १०० टक्के अॅक्सेप्ट करतो आहे, माझी चुकी झाली आहे. पण प्रभाग क्रमांक ३६ मध्ये मी अनेक वर्षांपासून काम करतोय. मी एकनिष्ठ आहे. ढवळे यांना मी किंवा शिवसेनेचे कोणतेच पदाधिकारी ओळखत नाहीत. त्यांनी तो फॉर्म कुठून मिळवला, हेही आम्हाला माहीत नाही, असंही कांबळे यांनी म्हटलं आहे.
आणखी वाचा
Comments are closed.