मोठी बातमी! अर्ज मागे घेण्यावरुन मनसे पदाधिकाऱ्याची हत्या; भाजपच्या दोन गटात राडा
सोलापूर : महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात (Solapur) राजकीय वादातून भाजपमधील (BJP) दोन गटात टोकाचा वाद झाल्याच चित्र पाहायला मिळालं. महापालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी चांगलाच राडा झाला. सोलापुरातील जोशी गल्ली परिसरातील भाजपचे माजी नगरसेवक शंकर शिंदे यांचे संपर्क कार्यालय भाजपच्याच दुसऱ्या गटाने फोडले. आपल्या समर्थक उमेदवारास उमेदवारी न मिळाल्याच्या करणावरून दुसऱ्या गटाने कार्यालय फोडल्याचा आरोप करण्यात आला. यावेळी, पोलिसांनी (Police) मोठा बंदोबस्त लावून हस्तक्षेप केला. मात्र, येथील राड्यातच एका तरुणाची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. दरम्यान, या घटनेनंतर महापालिका परिसरातील घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे.
सोलापूर शहरात राजकीय वादातून एकाची हत्या करण्यात आली असून बाळासाहेब सरवदे असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मनसे विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी असलेल्या बाळासाहेब सरवदे यांची राजकीय वादातून हत्या झाल्याचा आरोप केला जात असून या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. सोलापूर महापालिका प्रभाग 2 मध्ये अर्ज माघारी घेण्यावरून आज भाजपच्या दोन गटात वाद झाला. प्रभाग दोनमध्ये शालन शिंदे ह्या भाजपच्या अधिकृत उमेदवार आहेत, तर त्यांच्याविरोधात भाजपच्या बंडखोर रेखा सरवदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. रेखा सरवदे यांनी अर्ज माघारी घ्यावा यासाठी शिंदे आणि सरवदे या दोन गटात मोठा वाद झाला, या वादात भाजप नेते शंकर शिंदे यांचे कार्यालय देखील फोडण्यात आले. मात्र, त्याचवेळी शिंदे गटाच्या लोकांनी मध्यस्तीसाठी आलेल्या बाळासाहेब सरवदे यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप सरवदे यांच्या नातेवाईकांनी केला आहे. ह्या हल्यात गंभीर जखमी झालेल्या बाळासाहेब सरवदे यांना उपचारासाठी सोलापूरच्या सहकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, उपचारा दरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. या घटनेनंतर शहरात तणावाचे वातावरण असून पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे.
सोलापुरातील मनसेच्या नेत्याचा गंभीर आरोप
दरम्यान, प्रभाग 2 मधून भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांचे पुत्र किरण देशमुख हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. हे संपूर्ण पॅनल बिनविरोध करण्यासाठी भाजपकडून मोठा दबाव होता, त्यामुळे सरवदे कुटुंबावर भाजप नेत्यांकडून दबाव आणला जातं होता. समाजात वाद नको म्हणून ते सोडवायला मनसे नेते बाळासाहेब सरवदे गेले होते. त्यावेळी शिंदे गटातील लोकांनी त्यांची हत्या केल्याचा आरोप मनसेचे पदाधिकारी प्रशांत इंगळे यांनी केला आहे. मनसेचे लोकसभा क्षेत्र प्रमुख प्रशांत इंगळे यांनी हा गंभीर आरोप केला आहे.
हेही वाचा
आम्ही महायुतीसोबच, पण..; रामदास आठवलेंचं बंड झालं थंड; देवेंद्र फडणवीसांकडून मिळाला शब्द
आणखी वाचा
Comments are closed.