बंडखोरांना रोखण्यात भाजपलाही अपयश, मुंबईत कोण कोणत्या प्रभागात नाराजांनी उगारलं बंडाचं निशाण
मुंबई महानगरपालिका निवडणूक: आजपासून राज्यातील महानगरपालिकेच्या निवडणुकीला खरी सुरुवात झाली आहे. कारण आज उमेदवारी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस होता. आजच्या दिवशी अनेक उमेदवारांनी बंडखोरी केल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. सर्वच राजकीय पक्षातील उमेदवारांनी बंडाचं निशाण उगारलं आहे. मुंबईत महानगर पालिकेच्या निवडणुकीत देखील भाजपच्या तिकीट न मिळालेल्या काही कार्यकर्त्यांनी बंडखोरी केली आहे. शेवटच्या म्हणजे आजच्या दिवशी हे बंडखोर उमेदवारी अर्ज माघारी घेतील, असी शक्यता वर्तवण्यात येत होता.
भाजपमधील बंडखोरीवर कायम असलेले उमेदवार
भाजपच्या बंडखोर उमेदवार दिव्या ढोले या वॉर्ड क्रमांक 60 मधून बंडखोरीवर ठाम आहेत. भाजपकडून वॉर्ड क्रमांक 60 मधून सायली कुलकर्णी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
वॉर्ड क्रमांक 173 मधून भाजपच्या शिल्पा केळुसकर यांची बंडखोरी कायम आहे. याठिकाणी शिवसेनेने पूजा कांबळे यांना उमेदवारी दिलेली आहे.
भाजप बंडखोर जान्हवी राणे या वॉर्ड क्रमांक 205 मधून लढण्यावर ठाम आहेत. याठिकाणी वर्षा शिंदे यांना भाजपने उमेदवारी दिली आहे.
माजी नगरसेविका नेहल शाह या वॉर्ड क्रमांक 177 मध्ये बंडखोरीवर ठाम आहेत. भाजपकडून कल्पेशा जेसल कोठारी यांना उमेदवारी दिली आहे.
वार्ड क्रमांक 180 मध्ये जान्हवी पाठक यांनी केलेली बंडखोरी कायम ठेवली आहे. या ठिकाणी शिवसेनेच्या तृष्णा विश्वासराव अधिकृत उमेदवार आहेत.
मुंबईत महानगरपालिकेच्या निवडणुकीची जोरदार चर्चा सुरु
महानगरपालिकेच्या निवडुकीला सुरुवात झाली आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. अनेक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज माघारी घेतले आहेत. तर काही जणांनी बंडखोरी देखील केली आहे. दरम्यान, काही ठिकाणी भाजपचे नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. तसेच शिवसेना शिंदे गटाचे देखील नगरसेवक बिनविरोध निवडून आले आहेत. दरम्यान, सध्या मुंबईत महानगरपालिकेच्या निवडणुकीची जोरदार चर्चा सुरु आहे. कारण दोन ठाकरे बंधू एकत्र आले आहेत. तिकडे भाजप आणि शिवसेना शिंदे गट एकत्र आले आहेत. तर अजित पवारांची राष्ट्रवादी स्वबळावर निवडणूक लढवत आहे.
भाजप 137 जागांवर लढणार
मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या (BMC Election) रणधुमाळीत मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेने (शिंदे गट) मुंबईतील 90 जागांवर निवडणूक लढवत आहे. महायुतीमध्ये भाजप सोबत जागावाटपाचा तिढा सुटला असून, भाजप 137 जागांवर लढणार आहे. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी टाळण्यासाठी खबरदारी घेत थेट उमेदवारांना एबी फॉर्म वाटप सुरू केले होते. त्यामुळे अधिकृत यादी जाहीर न करता थेट उमेदवारांना एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले होते.
आणखी वाचा
Comments are closed.