राज ठाकरेंचं अदानी समूहाच्या विस्ताराचा ‘तो’ नकाशा दाखवला, भाजपकडून पहिला पलटवार

BMC निवडणूक 2026 वर राज ठाकरेंची अदानी ग्रुपवर टीका: मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी रविवारी शिवाजी पार्कवरील सभेत गेल्या 10 वर्षांमध्ये मुंबईसह देशभरात अदानी समूहाने कशाप्रकारे हातपाय पसरले, याचा एक व्हिडीओ सादर केला. 2014 पूर्वी देशात नाममात्र अस्तित्व असलेल्या अदानी समूहाला (Adani Group) भाजपच्या काळात मुंबई आणि महाराष्ट्रात कशाप्रकारे प्रकल्प आणि जमिनी मिळाल्या, हे राज ठाकरे यांनी अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला. राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी सभेत अदानी समूहाबाबत दाखवलेल्या या व्हिडीओची सध्या प्रचंड चर्चा सुरु आहे. या पार्श्वभूमीवर आता भाजपकडून (BJP) ठाकरे बंधूंवर पहिला वार करण्यात आला आहे. भाजपचे आमदार नितेश राणे यांनी एक ट्विट करुन ठाकरे बंधूंना लक्ष्य केले आहे. (BMC Election 2026)

ठाकरेंना अदानी चालत नाहीत. पण चंगेज मुलतानी आणि झोहरान ममदानी चालतो. मुंबईकरांनी सावध राहिले पाहिजे, असे नितेश राणे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. यावर आता मनसे आणि ठाकरे गटातून काय प्रतिक्रिया येणार, हे पाहावे लागेल.

Raj Thackeray speech: राज ठाकरे अदानी समूहाबाबत नेमकं काय म्हणाले?

राज ठाकरे यांनी काल शिवाजी पार्कवरील सभेत त्यांच्या नेहमीच्या ‘लाव रे तो व्हिडीओ’ स्टाईलमध्ये एक व्हिडीओ दाखवला. या व्हिडीओत अदानी समूहाने 2014 साली देशात भाजपची सत्ता आल्यानंतर देशभरात कशाप्रकारे विस्तार केला, याचा एक नकाशा दाखवला. या नकाशात अदानी समूहाला 2014 नंतर प्रत्येक वर्षी कशाप्रकारे प्रकल्प मिळत गेले, याचे सविस्तर प्रेझेंटेशन होते. मुंबईतील धारावी आणि मुंबई विमानतळाची जागा अदानी समूहाला विकण्याचा डाव असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला. अदानी समूह कधी सिमेंट उद्योगात नव्हता. गेल्या दहा वर्षांमध्ये अदानी समूह देशातील दुसऱ्या क्रमांकाची सिमेंट उत्पादक झाला आहे. देशातील सर्व सरकारी प्रकल्पांसाठी त्यांच्याच कंपनीचे सिमेंट वापरले जाते. मुंबई विमानतळ, नवी मुंबई विमानतळ अदानींच्या ताब्यात गेले असून वाढवणमधील प्रस्तावित विमानतळही त्यांच्याच ताब्यात जाईल, अशी शक्यता राज ठाकर यांनी बोलून दाखवली.  मी उद्योगपतींच्या विरोधात नाही. मात्र, एकाच उद्योगपतीला अशाप्रकारे मोठे केले जात आहे, असे राज ठाकरे यांनी म्हटले.

आणखी वाचा

धीरगंभीर बॅकग्राऊंड म्युझिक, धडकी भरवणारा नकाशा; राज ठाकरेंच्या भाषणावेळी शिवाजी पार्कवर चिडीपूच शांतता, नेमकं काय घडलं?, VIDEO

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या शिवाजी पार्कवरील सभेला गर्दी किती?; पाहा टॉप 20 PHOTO

आणखी वाचा

Comments are closed.