आदित्य ठाकरेंनी 5 फोटो दाखवले, देवेंद्र फडणवीसांना घेरले; जयंत पाटील राज-उद्धव ठाकरेंसमोर सगळं
आदित्य ठाकरे देवेंद्र फडणवीसांवर मुंबई: 25 वर्षांत आम्ही काहीच केलं नाही, असा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) करतात. मला झोपेतून जरी उठवलं, तरी मी 25 वर्षांत आम्ही काय केलं, ते सांगू शकतो. कुठलाही कर न लावता 92 हजार कोटी ठेवी जमा केल्या. या ठेवी मुंबईच्या सेवेला ठेवल्यात. ते म्हणतात काम दाखवा आणि 3000 हजार रुपये घ्या. आम्हाला 3 हजार रुपये देण्यापेक्षा तुम्ही लाडक्या बहिणीला आत्ता आधी 2100 रुपये द्या, असा हल्लाबोल ठाकरे गटाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केला. तसेच लाव रे तो फोटो म्हणत आदित्य ठाकरेंनी 5 महत्वाचे फोटो दाखवत देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर दिले.
आदित्य ठाकरेंचे काही 5 फोटो दाखवले? (देवेंद्र फडणवीस यांच्यावर अफरातफर)
1. कोस्टल रोड जिओ टेक्निकल सर्व्हे (2016)- या फोटोमध्ये उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे दिसतायत. काम सुरु होण्याआधी कामाचा सर्व्हे करण्यात येतो.
2. कोस्टल रोड भूमीपूजन (2018)…मुंबई महानगरपालिकेचे महाडेश्वर महापौर असताना कोस्टल रोडचं भूमीपूजन करण्यात आले होते. इकडेही देवेंद्र फडणवीस कुठेचं दिसत नाही. कारण याच कार्यक्रमात भाजपने बहिष्कार टाकला होता.
3. कोस्टल रोडचं टनिंग मशीनचं काम सुरु करतानाचा फोटो-
4. कोस्टल रोडचं टनलचं काम सुरु करतानाचा फोटो- या फोटोमध्ये अधिकारी अश्विनी भिडे दिसतायत. त्यासोबत आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे देखील उपस्थित होते.
5. टनल बोअरिंग मशीनचा फोटो- हे मशील आपण आपल्या काळात आणलं होतं. याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. आणि या मशीनला मावळा असं नाव दिलं होतं.
जयंत पाटील यांच्याकडून आदित्य ठाकरेंचं कौतुक- (Jayant Patil On Aditya Thackeray)
मुंबईचे प्रश्न सोडायची जिद्द आदित्य ठाकरे यांच्यात निर्माण झाली आहे. उद्धवजी महाराष्ट्राची जबाबदारी तुमच्यावर आहे. पण मुंबईची जबाबदारी आदित्य ठाकरे यांच्यावर सोडून मोकळ व्हायला हरकत नाही. एवढी आदित्य ठाकरे यांच्यात मुंबईचे प्रश्न सोडण्याची जिद्द निर्माण झाली आहे, असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील यांनी राज ठाकरे, उद्धव ठाकरेंसमोर आदित्य ठाकरेंचं कौतुक केलं. स्टेजच्या मागचं पोस्टर बगून मला आनंद होतोय, भावकी एकत्र आली आहे. मुंबईकरांना कधीच एवढा मोठा आनंद झाला नसावा. महाराष्ट्रातील माणूस बघतोय दोन्ही भाऊ एकत्र आले, असंही जयंत पाटील यांनी सांगितले.
राज ठाकरेंचा भाजपचा राडा – (Raj Thackeray On BJP)
अकोटमध्ये भाजपने एमआयएमसोबत युती केली. बदलापुरात भाजपने काँग्रेससोबत युती केली. भाजपचे 66 जण बिनविरोध निवडून आले. म्हणजे 66 ठिकाणी मतदार मतदान करू शकत नाहीत. तुळजापूरात ड्रग्ज रॅकेटमधला आरोपी विनोद गंगणेला भाजपने तिकीट दिलं. बदलापुरातील बलात्काराच्या प्रकरणातील सह-आरोपी तुषार आपटेला नगरसेवक केलं. ही हिंमत भाजपमध्ये आली कुठून?, असा सवाल मनसेप्रमुख राज ठाकरेंनी उपस्थित केला. सध्या महाराष्ट्रात जे काही सुरू आहे त्याचं चित्र पाहून तुम्हाला भीती वाटली नाही तर निवडणुका न लढवलेल्याच बऱ्या, असं राज ठाकरे म्हणाले.
आदित्य ठाकरेंचं भाषण, VIDEO:
आणखी वाचा
Comments are closed.