धक्कादायक! 35 रुपयावरुन दोघांमध्ये भांडण, वाद सोडावायला गेलेल्या काकावर पेट्रोल टाकून लावली आग
मुंबई क्राईम न्यूज : मुंबईच्या जोगेश्वरी परिसरात धक्कादायक घटना घडली आहे. 35 रुपये बाकी असल्याचा राग मनात धरुन मित्रानेच आपल्या मित्राच्या काकाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला आहे. सिगरेटच्या 35 रुपयावरुन दोन व्यक्तींमध्ये वाद झाला होता. याचा राग धरून भांडण सोडवायला गेलेल्या मित्राच्या काकाला मित्रांनीच पेट्रोल टाकून जीवन जाळण्याचे प्रयत्न केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी कारवाई केली आहे.
नेमकी कशी घडली घटना?
22 वर्षीय नागेंद्र यादव यांनी आपल्या मित्राचा काका राजेंद्र यादव यांच्यावर पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. संपूर्ण घटना जोगेश्वरी परिसरात एका पान टपरीवर घडली. सिगरेटच्या पैसे घेण्यावरुन पान टपरीवर नागेंद्र यादव आणि त्याच्या मित्रामध्ये वाद झाला होता. यावेळी वाद सोडवायला गेलेल्या राजेंद्र यादव याच्यावर नाराज मित्रांनी पेट्रोल टाकून आग लावून दिली. पेट्रोल टाकून जिवंत जाळण्याची घटना तिथे असलेल्या सीसीटीव्ही कॅमेरा मध्ये सर्व दृश्य कैद झालं आहे. या आगीत राजेंद्र यादव गंभीर भाजून जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. याप्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्हीच्या आधारे आरोपी नागेंद्र यादव ला अटक करून पुढील तपास सुरू केली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील पुणे-बंगळूरु राष्ट्रीय महामार्गावर इलेक्ट्रिक बाइकला अचानक आग
कोल्हापूर जिल्ह्यातील पुणे-बंगळूरु राष्ट्रीय महामार्गावर इलेक्ट्रिक बाइकला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. धूर येत असल्याचे समजल्यानंतर लेगच चालकाने प्रसंगावधान साधत बाईक बाजूला घेतली. त्यानंतर काही वेळाने गाडीने पेट घेतला. दरम्यान, ही घटना उचगाव नजीकच्या मार्गावर घडली आहे. दरम्यान, या घटनेत गाडी पूर्णपणे जळून खाक झाली आहे.निवास यमगर असं दुचाकीच्या मालकाच नाव आहे. या घटनेनंतर महामार्गावर बघ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमल्याचं पाहायला मिळालं.
महत्वाच्या बातम्या:
Navi Mumbai Vashi Fire: नवी मुंबईत अग्नितांडव, कामोठ्यानंतर वाशीतील रहेजा कॉम्प्लेक्समध्ये भीषण आग, चौघांचा मृत्यू
आणखी वाचा
Comments are closed.