मुंबईतील दोन उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची निवडणूक आयोगाकडे तक्रार

मुंबई : मुंबईतील दोन uमेदवारांची उमेदवारी रद्द करा, अशी तक्रार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने निवडणूक आयोगाकडे केली आहे. वॉर्ड क्रमांक 118 व 122 मधील उमेदवारांची तक्रार केली आहे. वैशाली जी व प्रशांत जी या दोन्ही उमेदवारांची उमेदवारी रद्द करावी, अशी तक्रार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केली आहे. या उमेदवारांनी संघाचे पुरस्कृत उमेदवार म्हणून उल्लेख केला होता. यानंतर आरएसएसने कारवाई करण्याची मागणी केली आहे.

देश जनहित पार्टीकडून या दोन्ही उमेदवारांना उमेदवारी मिळाली होती.

देश जनहित पार्टीकडून या दोन्ही उमेदवारांना उमेदवारी मिळाली होती. संघाचे पुरस्कृत उमेदवार म्हणून उल्लेख केल्याने आरएसएसने कारवाईची करण्याची मागणी केली आहे. मतदारांची दिशाभूल केल्याने कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

15 जानेवारीला मतदारांचा कौल मतपेटीत कैद होणार

उद्या म्हणजेच 15 जानेवारीला मतदारांचा कौल मतपेटीत कैद होणार आहे. तर 16 जानेवारीला राज्यातील महापालिकांचे चित्र स्पष्ट होणार आहे. एकीकडे हि कार्यकर्त्यांची निवडणूक असल्याचे जरी बोलल्या गेलं तरी राज्यातील अलीकडे जाहल्या राजकीय स्थित्यांतरानंतर मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसून आल्या आहे. त्यामुळे हि निवडणूक प्रतिष्ठेची झाली असल्याचेही दिसून आलंय.

राष्ट्रीय स्वयंस्वेक संघ कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा वैयक्तीक उमेदवारांना पुरस्कृत करत नाही

राष्ट्रीय स्वयंस्वेक संघटना ही सांस्कृतिक संघटना आहे. त्यामुळं संघ कोणत्याही राजकीय पक्षाला किंवा वैयक्तीक उमेदवारांना पुरस्कृत करत नाही. अशा अपप्रचारामुळं मतदारांमध्ये संभ्रेमाचे वातावरणनिर्माण होत आहे. मतदारांना जाणीवपूर्वक भ्रमित करुन जाणीवपूर्वक मतदारांची दिशाभूल करण्याचे काम सुरु असल्याचं पत्पात म्हटलं आहे.

दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या कालावधीत मतदान

बृहनमुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26  अंतर्गत गुरुवार, दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या कालावधीत मतदान प्रक्रिया होणार आहे. या निवडणुकीत मतदान करण्यासाठी पात्र मतदाराने मतदान केंद्रावर स्वतःची ओळख पटवण्यासाठी छायाचित्र असलेले मतदार ओळखपत्र सादर करावे. परंतु ज्यांच्याकडे छायाचित्र असलेले मतदार ओळखपत्र नसेल, अशा मतदारांना ओळख पटविण्यासाठी माननीय राज्य निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या १२ पैकी कोणताही एक पुरावा सादर करावा.

मतदार ओळखपत्र नसल्यास ग्राह्य धरले जाणारे अन्य 12 प्रकारचे पुरावे

१) भारताचे पारपत्र (पासपोर्ट)
२) आधार ओळखपत्र
३) वाहन चालविण्याचा परवाना (ड्रायव्हिंग लायसन्स)
४) आयकर विभागाकडील पॅन ओळखपत्र (पॅन कार्ड)
५) केंद्र शासन / राज्य शासन / सार्वजनिक उपक्रम / स्थानिक स्वराज्य संस्था यांनी आपल्या कर्मचाऱयांना छायाचित्र (फोटो) सह दिलेली ओळखपत्रे
६) राष्ट्रीयकृत बँका अथवा टपाल खात्‍यामधील खातेदाराचे छायाचित्र (फोटो) असलेले पासबूक
७) सक्षम प्राधिकाऱयाने छायाचित्रासह दिलेला दिव्यांग (अपंगत्वाचा) दाखला
८) राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेखालील छायाचित्र असलेले ओळखपत्र (मनरेगा जॉब कार्ड)
९) निवृत्त कर्मचाऱयांची अथवा त्यांच्या विधवा / अवलंबित व्यक्तींची फोटो असलेली निवृत्ती वेतन विषयक कागदपत्रे (उदा. पासबूक, प्रमाणपत्र इ.)
१०) लोकसभा / राज्यसभा सचिवालय तसेच विधानसभा / विधानपरिषद सचिवालय यांनी आपल्या सदस्यांना दिलेले अधिकृत ओळखपत्र
११) स्वातंत्र्य सैनिकाचे छायाचित्र असलेले ओळखपत्र
१२) केंद्र शासनाच्या श्रम मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा योजनेचे छायाचित्रासह कार्ड

महत्वाच्या बातम्या:

राष्ट्रवादीच्या उमेदवाराकडून हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात पैसे वाटप?.शिंदेसेनेचा आरोप, घटनास्थळी पोलीस दाखल

आणखी वाचा

Comments are closed.