गाफील राहून चालणार नाही… गुजराती अभिनेत्रीचा राज ठाकरेंना पाठिंबा? अस्खलित मराठीत हात जोडत Vi

BMC निवडणूक 2026: राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी आज मतदान होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून महापालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून सर्वच राजकीय पक्षांनी प्रतिष्ठा पणाला लावली आहे. मुंबई महापालिकेच्या सत्तेचा पारड कुणाच्या बाजूने झुकणार याचा निर्णय होण्यासाठी आता अवघे काही तास उरले आहेत. मुंबई महापालिकेसाठी उद्धव सेना- मनसे- राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार अशी मुख्य लढत राहणार आहे. मनसेची भूमिका कायमच मराठी माणसांच्या बाजूने राहिली आहे. काही दिवसांपूर्वीच राज ठाकरेंनी (Raj Thackeray) मुंबई शहर गुजरातला जोडण्याचा धोका असल्याचा वारंवार इशारा दिला होता. दरम्यान, महापालिकेच्या पार्श्वभूमीवर एका गुजराती लोकप्रिय अभिनेत्रीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. विशेष म्हणजे या अभिनेत्रीने चक्क अस्खलित मराठीतून मुंबईच्या प्रश्नांवर भाष्य करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिकेला अप्रत्यक्षपणे पाठिंबा दिलाय. या अभिनेत्रीचं नाव जिगना त्रिवेदी असं आहे.

गाफील राहून चालणार नाही..

अभिनेत्री जिगना त्रिवेदीने सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या आपल्या व्हिडिओमध्ये मुंबईच्या सद्यस्थितीवर मार्मिक भाष्य केलंय. ती म्हणाली,” नमस्कार महाराष्ट्र. कसे आहात. महाराष्ट्र राज्यात महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. मतदान करायला तयार आहात का? एक सांगते, जेव्हा आपण सारे कपडे विकत घ्यायला जातो तेव्हा आपण विचार करतो. बाईने जर दोन-तीन दिवस भांडी नाही घासली तर तिच्याकडे तक्रार करतो. मग आता आपलं महाराष्ट्र राज्य पुढच्या पाच वर्षात कोणाच्या हातात द्यायचा आहे याचा निर्णय घेण्याची संधी आहे. त्यामुळे गाफील राहून चालणार नाही.  मुंबई हे विकसित शहर होतच. त्यामुळे गेलं कित्येक वर्षांपासून लोक इथे काम करायला येतात. त्यामुळे केवळ मुंबई विकसित करून चालणार नाही. ग्रामीण भागातील रस्ते, पायाभूत सुविधा आणि विकासाकडे बघा. विकास हा महत्त्वाचा आहेच. पण आपल्याला असा विकास नकोय जिथे आपला श्वास गुदमरेल. आपली पुढची पिढी शारीरिकदृष्ट्या कमकुवत निघेल. आपल्यासमोर कितीतरी डोळे उघडणारा वास्तव आणि फॅक्ट्स आहेत. त्याच्याकडे बघा. “

https://www.instagram.com/reel/DTf0DG_DKXt/?igsh=ZjY1emUzZXZkNm1l

ती पुढे म्हणाली,” मुंबई आता संधी आणि वेळ दोन्ही आहेत. आता तुमची चॉईस कोण चांगलं किंवा वाईट यामध्ये नाही. तर कोण कमी वाईट आहे आणि कोण जास्त वाईट आहे याच्यात आहे. आता आपला महाराष्ट्र खऱ्या राजाच्या हातात द्यायची संधी आहे. ही संधी चुकवू नये. जय महाराष्ट्र.” जिगना त्रिवेदी एक लोकप्रिय गुजराती अभिनेत्री आहे. जिगनाचे अनेक गुजराती नाटक आणि सिनेमे गाजले आहेत.

चुकाल तर सर्वच मुकाल…

मुंबई गुजरातला जोडण्याचे दीर्घकालीन नियोजन सुरू असल्याचा आरोप करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीका केली होती. वाढवन बंदराला लागून लगेच गुजरात आहे मुंबई गुजरातला न्यायची असा लॉन्ग टर्म प्लॅन आहे. याचा दीर्घकाळ पासून नियोजन सुरू आहे. 2014 लोकसभा निवडणुकीनंतर भारताचा नकाशा दाखवत मोदी पंतप्रधान होण्यापूर्वी अदानी कुठे होते असा सवाल केला होता. बाहेरच्या लोकांना मुंबईचे प्रश्न कळत नाहीत असेही राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं.

आणखी वाचा

Comments are closed.