महाराष्ट्रात कुणी मतदान करु देता का मतदान? निवडणूक आयोगाच्या कारभारावर रोहित पवारांची टीका
निवडणूक आयोगावर रोहित पवार आज राज्यातील 29 महानगरपालिका निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया पार पडली आहे. या मतदानावेळी अनेक ठिकाणी गोंधळ झाल्याचं पाहायला मिळालं. बोगस मतदान, मतदान यंत्रातील बिघाड, बोटावरील शाई पुसणे, दुसऱ्याच व्यक्तीने मतदान करुन जाणे तर काही ठिकाणी पैसे वाटप करुन गेल्यासह मतदान करतानाचे व्हिडीओ देखी व्हायरल झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, याच मुद्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी निवडणूक आयोगावर जोरदार टीका केली आहे. मला महाराष्ट्रात कुणी मतदान करू देता का मतदान? असा सवाल रोहित पवार यांनी केला आहे.
नेमकं काय म्हणाले रोहित पावर ?
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी ट्वीट करत निवडणूक आयोगावर टीका केली आहे. आज राज्यभरातील निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार बघून सामान्य मतदार म्हणतोय मला महाराष्ट्रात कुणी मतदान करू देता का मतदान? अशी टीका रोहित पवार यांनी केली आहे. कारण आज मतदानाच्या दिवशी सकाळापासूनच अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये बिघाड झाल्याचं पाहायला मिळालं. तर काही ठिकाणी बोगस मतदान झाल्याच्या घटना देखीलस समोर आल्या आहेत त्याचबरोबर मतदार याद्यांमधील घोळ देखील समोर आला आहे. यावरुनच रोहित पवारांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे.
धनुष्यबाण चिन्ह दाबल्यानंतर ईव्हीएम मशीनवर भाजपचा लाईट लागत असल्याचा शिवसेनेचा आरोप
नाशिक महापालिकेच्या (NMC Election Voting) 122 जागांसाठी आज (दि. १५) मतदान प्रक्रिया सुरू असताना शहरातील प्रभाग क्रमांक 24 मधील एका मतदान केंद्रावर गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे. ग्रामदेव प्राथमिक शाळेतील मतदान केंद्रावर ईव्हीएम (EVM) मशीनच्या कार्यपद्धतीवर संशय व्यक्त करत शिवसेना शिंदे गटाच्या (Shiv Sena Shinde Faction) उमेदवारांकडून गंभीर आरोप करण्यात आले आहेत. शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवारांचा दावा आहे की, मतदारांनी धनुष्यबाण चिन्ह दाबल्यानंतर ईव्हीएम मशीनवर भाजपचा लाईट लागत आहे. या प्रकारामुळे मतदान प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, मतदान केंद्रावर तणावाचे वातावरण पसरले आहे. मालेगावात (मालेगाव महानगरपालिका) एकाच ठिकाणी 200 पेक्षा जास्त मतदान कार्ड (Voter ID Cards) सापडल्याची कार्यक्रम घडलीय. इतक्या मोठ्या प्रमाणात मतदान कार्ड सापडून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. शिवाय हे मतदान कार्ड बोगस असल्याचा संशय देखील बळावला आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी मतदान करतानाचे व्हिडीओ देखील व्हायरल झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
धक्कादायक! छत्रपती संभाजीनगरमध्ये मतदान केंद्राबाहेरच पैशाचं वाटप सुरु, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल
आणखी वाचा
Comments are closed.