मुंबईतून ठाकरेंची सत्ता गेली अन् काहीवेळातच कट्टर शिवसैनिकाने घेतला जगाचा निरोप, बाळासाहेबांच्य
मुंबई महानगरपालिका निवडणूक: मुंबई महानगरपालिका निवडणुकीत अपेक्षेप्रमाणे निकाल न लागल्याने शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. तब्बल अडीच दशकांहून अधिक काळ मुंबईवर वर्चस्व राखणाऱ्या ठाकरे गटाला यंदाच्या निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागला. या निवडणुकीत मुंबईत ठाकरे गटाला केवळ 65 जागांवर समाधान मानावे लागले असून भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. या राजकीय धक्क्यानंतर काही तासांतच ठाकरे गटासाठी आणखी एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली. शिवसेनेच्या पहिल्या महिला आमदार आणि ज्येष्ठ नेत्या नीला देसाई यांचे शुक्रवारी रात्री निधन झाले. रात्री सुमारे 10 वाजता त्यांना तीव्र हृदयविकाराचा झटका आला. तत्काळ उपचार मिळण्यापूर्वीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
नीला देसाई जुन्या आणि निष्ठावंत नेत्या
नीला देसाई या शिवसेनेच्या जुन्या आणि निष्ठावंत नेत्या म्हणून ओळखल्या जात होत्या. ज्या काळात राजकारणात महिलांची उपस्थिती अत्यंत मर्यादित होती, त्या काळात बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्यावर विश्वास टाकत त्यांना संधी दिली होती. त्या शिवसेनेच्या पहिल्या महिला आमदार ठरल्या होत्या आणि विधान परिषदेच्या सदस्य म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली होती.
मुंबईतील निवडणूक निकालानंतर ठाकरे गटात निराशेचं वातावरण असतानाच देसाई यांच्या निधनाने पक्षावर शोककळा पसरली आहे. पराभवाची सल आणि अनुभवी नेत्या गमावण्याचं दुःख असा दुहेरी आघात ठाकरे गटाला सहन करावा लागत आहे. नीला देसाई यांच्या निधनाचं वृत्त समजताच राजकीय, सामाजिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पार्थिवावर आज दुपारी 12 वाजता अंत्यसंस्कार होणार असून, यावेळी शिवसेनेचे अनेक ज्येष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
227 जागांसाठी मुंबईत सत्तासंघर्ष
मुंबई महानगरपालिकेच्या 227 जागांसाठी झालेल्या निवडणुकीत सुमारे 52.94 टक्के मतदान नोंदवले गेले. महापालिकेत सत्ता स्थापन करण्यासाठी किमान 114 जागा जिंकणं आवश्यक असून हा बहुमताचा टप्पा कोण गाठणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.या निवडणुकीत मुंबईत राजकीय समीकरणं वेगळीच पाहायला मिळाली. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना ठाकरे गटाने राज ठाकरे यांच्या मनसेसोबत युती केली, तर या आघाडीला शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा मिळाला. त्यामुळे शिवसेना ठाकरे गट, मनसे आणि शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रितपणे निवडणूक रिंगणात उतरली.
दुसरीकडे, मुंबईतील सत्ता हस्तगत करण्यासाठी भाजप आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने आक्रमक प्रचार करत पूर्ण ताकद लावली. अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्रपणे निवडणूक लढवत होती, तर काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांनी युतीतून मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला.
आणखी वाचा
Comments are closed.