राज ठाकरेंच्या पराभवाबाबत संजय राऊतांचं महत्त्वाचं भाष्य, म्हणाले, मनसेच्या 8-10 जागा…

राज ठाकरे आणि संजय राऊत बीएमसी निवडणूक निकाल 2026: गेल्या काही दिवसांपासून राज्यातील संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत ठाकरे बंधूंचा (Thackeray Brothers) पराभव झाला आहे. या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक 89 जागा जिंकल्या, तर शिंदे गटाने 29 जागांवर विजय मिळवला. तर ठाकरे गटाचे 65 आणि मनसेचे (MNS) 6 उमेदवार विजयी झाले. 2017 च्या निवडणुकीत शिवसेनेला 84 जागांवर विजय मिळाला होता. त्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीत ठाकरेंच्या जागा कमी झाल्या असल्या तरी 65 जागांवर उबाठाला (UBT) विजय मिळाला आहे. मात्र, 53 जागा लढवणाऱ्या मनसेला अवघ्या 6 जागांवर समाधान मानावे लागले. ठाकरे बंधू एकत्र येऊनही मनसेचा इतका मोठा पराभव झाल्याने त्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. मनसेच्या या पराभवावर ठाकरे गटाचे फायरब्रँड नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाष्य केले आहे.

मुंबई महानगरपालिकेत आमचा पराभव झाला, असे आम्ही मानत नाही. मनसेला आणखी 10 ते 12 जागा मिळणे अपेक्षित होते. मात्र, त्यांचे अनेक उमेदवार फार थोड्या फरकाने पडले आहेत. आम्ही शिवसैनिकांनी मनसेच्या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रयत्नांची शर्थ केली. देवेंद्र फडणवीस शिवसेना-मनसेत भांडण लावत आहेत. शिवसेना हा मुंबईतील मूळ पक्ष आहे, आधीची ताकद ८४ होती, आम्हीही कमी झालो. या निवडणुकीत मनसेला 20 जागा मिळू शकतात, असे वाटले होते. या निवडणुकीनंतरही आम्ही एकत्रच राहू, असे संजय राऊत यांनी सांगितले. ठाण्यात शिंदे आले, तिथे भाजपची ताकद मोठी होती ना? ठाण्यात आमचा फक्त एक नगरसेवक निवडून आला आहे. ही ठिणगी आहे, एक वर्तुळ पूर्ण झाले आहे. आता एकनाथ शिंदे यांचे आता अध:पतन होणार आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले.

Mumbai Election Results 2026: मुंबईत कोणत्या पक्षाल किती जागा मिळाल्या?

भाजप- 89
ठाकरे गट- 65
शिवसेना- 29
काँग्रेस- 24
एमआयएम-8
मनसे- 6
राष्ट्रवादी काँग्रेस- 3
समाजवादी पक्ष- २
शरद पवार गट-1

मुंबई बातम्या: मुंबईत कोणत्या पक्षाला किती टक्के मतं मिळाली?

भाजप- 21.2 टक्के
ठाकरे गट- 13.13 टक्के
शिवसेना- 5 टक्के
काँग्रेस- 4.44 टक्के
एमआयएम-1.25 टक्के
मनसे- 1.37 टक्के
राष्ट्रवादी काँग्रेस- 0.45 टक्के
सपा- 0.28 टक्के
शरद पवार गट- 0.22 टक्के

आणखी वाचा

राज ठाकरेंचा ‘अदानीकरणाचा’ मुद्दा धारावीत चालला, धारावीतील सात पैकी सहा जागी महायुतीचा पराभव!

BMC Election 2026: धारावीपासून ते दादर, लालबाग वरळी, शिवडीपर्यंत फक्त ठाकरें बंधूंनाच मराठी मनाचा कौल! फक्त उत्तर भारतीय, गुजरात्यांनी भाजप शिंदे गटाचा टांगा पलटी होता होता वाचवला

आणखी वाचा

Comments are closed.