35 लाख नोकऱ्या, स्पोर्ट्ससिटी, मेडिसिटी प्रकल्प;दावोसमधून फडणवीसांची घोषणा, मुंबईला काय मिळालं?
दावोस येथे देवेंद्र फडणवीस : जागतिक स्तरावर महाराष्ट्राची विश्वासार्हता पुन्हा एकदा सिद्ध झाली असून विदेशी गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र हे भारताचे खरे गेटवे ऑफ इंडिया आहे असे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी व्यक्त केले आहे. स्वित्झर्लंडमधील दावोस येथे आयोजित वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या वार्षिक बैठकीत ते बोलत होते. महाराष्ट्रात गुंतवणुकीचा पाऊस पडेल, 35 लाख नोकऱ्यांची संधी निर्माण होईल, असंही देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. (Investment in Maharashtra)
राज्यात सध्या तिसरी मुंबई उभी राहत असून या क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक मिळण्याचे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. सुमारे 10 ते 12 वेगवेगळ्या क्षेत्रांतील उद्योगांशी सध्या समन्वय साधला जात आहे. नवी मुंबई विमानतळाजवळ एज्यु-सिटी, इनोव्हेशन सिटी, स्पोर्ट्स सिटी आणि मेडिसिटी यांसारखे प्रकल्प उभारले जात आहेत. गेल्या दशकात महाराष्ट्राने सातत्याने 10 टक्क्यांहून अधिक विकासदर राखला आहे. याच गतीने काम करत राहिल्यास 2032 ऐवजी 2030 पर्यंतच महाराष्ट्र 1 ट्रिलियन डॉलर्सची अर्थव्यवस्था बनण्याचे उद्दिष्ट गाठू शकेल असा विश्वास देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केला. दावोसमध्ये आतापर्यंत कोणत्या कंपनीने महाराष्ट्रात कुठे कुठे गुंतवणुक केली, जाणून घ्या…(Devendra Fadnavis At Davos)
महाराष्ट्र @ दावोस 2026
🤝दरम्यान सामंजस्य करार झाला
महाराष्ट्र सरकार आणि लोढा डेव्हलपर्स लि.एकूण गुंतवणूक: ₹1,00,000 कोटी
रोजगार: १,५०,०००क्षेत्र: IT/ITes – डेटा केंद्रे
प्रदेश : मुंबई महानगर प्रदेश
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अभिषेक लोढा, एमडी आणि सीईओ, लोढा… pic.twitter.com/xf11WkzRrI
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) 19 जानेवारी 2026
आतापर्यंत कोणत्या कंपनीने महाराष्ट्रात कुठे कुठे गुंतवणुक केली? (Which company has invested where in Maharashtra?)
1. गुंतवणूकदार : एसबीजी ग्रुप
गुंतवणूक : 20 बिलीयन डॉलर्स
रोजगार: 4 लाख 50 हजार
क्षेत्र: लॉजिस्टिक
कुठे : मुंबई, मुंबई महानगर
2. गुंतवणूकदार : सूरजागड इस्पात लि.
गुंतवणूक – 20 हजार कोटी रु.
रोजगार-8 हजार
सेक्टर – स्टील
कुठे – गडचिरोली
3. गुंतवणूकदार-सुमिटोमो रिअॅलिटी अँड डेवलपमेंट
गुंतवणूक – 8 बिलियन डॉलर्स
रोजगार – 80 हजार
4. गुंतवणूकदार-के. रहेजा कॉर्पोरेशन
गुंतवणूक – 10 बिलियन डॉलर्स
रोजगार – १ लाख
5. गुंतवणूकदार-अल्टा कॅपिटल/पंचशील रिअॅलिटी
गुंतवणूक – 25 बिलियन डॉलर्स
रोजगार – 2 लाख 50 हजार
6. गुंतवणूकदार – आयआयएएम ग्लोबल
गुंतवणूक – 8 बिलियन डॉलर्स
रोजगार – 80 हजार
7. गुंतवणूकदार – बीएफएन फोर्जिंग्ज
गुंतवणूक 565 कोटी रु.
rojar-847
सेक्टर – स्टील
कुठे – पालघर आणि मुंबई महानगर
8. गुंतवणूकदार-योकी ग्रीन एनर्जी लि.
गुंतवणक – 4 हजार कोटी
रोजगार – 6 हजार
क्षेत्र – पुनर्वापराची ऊर्जा
कुठे – पालघर आणि मुंबई महानगर
दावोसमधून गुंतवणुकीचा ओघ, VIDEO:
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.