कल्याण-डोंबिवलीत जे घडलं तेच मुंबईत होणार? बाळा नांदगावकरांचं सूचक विधान; म्हणाले, राजकारणात…

बाळा नांदगावकर: महापालिका निवडणुकांसाठी सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू असून केडीएमसी म्हणजे कल्याण डोंबिवली महापालिकेत एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला चक्क मनसेच्या नगरसेवकांनी पाठिंबा दिला आहे. विशेष म्हणजे, महापालिका निवडणुकीत दोन्ही पक्ष एकमेकांविरुद्ध लढत होते. तर, ठाकरे बंधू एकत्र आल्याने शिवसेना शिंदे गट-मनसेच्या या युतीवरुन जोरदार चर्चा रंगली आहे. तर कल्याण डोंबिवलीत जे घडलं तेच मुंबईत देखील घडणार का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. आता यावर मनसे नेते बाळा नांदगावकर (Bala Nandgaonkar) यांनी सूचक विधान केलंय. केडीएमसीमध्ये जे घडलं ते मुंबईत होणार नाही, यावर भाष्य करणे आता योग्य नाही असे त्यांनी म्हटले आहे. राजकारणात काहीही होऊ शकते. स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार आम्ही दिलेले आहेत, असे देखील बाळा नांदगावकर म्हणाले आहेत.

Bala Nandgaonkar: राजकारणात काहीही होऊ शकते

केडीएमसीमध्ये जे घडले तेच मुंबईत होणार का? असे बाळा नांदगावकर यांना विचारले असता ते म्हणाले की, त्यावर आता भाष्य करणे उचित नाही. कारण राजकारणात काहीही घटना घडत असतात. ज्याप्रमाणे चंद्रपूरला भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस एकत्र आली. कोकणात एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकत्र आली. स्थानिक पातळीवर आम्ही नेत्यांना अधिकार दिले होते, त्यानुसार त्यांनी निर्णय केलेला आहे. कुठे कोणते निर्णय घ्यायचे, यासाठी ठाकरे बंधू मुरलेले आहेत. ज्या प्रकारे कल्याण डोंबिवलीमध्ये झालं, त्यावर पक्ष कारवाई करू शकतो. त्या संदर्भातील निर्णय घेतला जाईल, असे बाळा नांदगावकर यांनी म्हटले आहे.

Uddhav Thackeray: मनसेच्या निर्णयामुळे उद्धव ठाकरे नाराज

दरम्यान, कल्याण-डोंबिवली महापालिकेतील नगरसेवकांनी काल उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. यावेळी उद्धव ठाकरेंनी नगरसेवकांना धीर देत, विरोधी पक्षात बसलो तरी सन्मानजनक वागणूक मिळेल, यासाठी पूर्ण प्रयत्न करू, असे आश्वासन दिले. नगरसेवकांनी दोन्ही पक्षांकडून संपर्क व प्रस्ताव येत असल्याचे सांगत मार्गदर्शन मागितले असता, कोणताही निर्णय पक्षपातळीवरच घेतला जाईल, सध्या तरी महापालिकेत विरोधी बाकावरच बसण्याचा निर्णय असल्याचे उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले. दरम्यान, मनसेच्या स्थानिक नेत्यांनी घेतलेल्या निर्णयावर उद्धव ठाकरे नाराजी व्यक्त करताना म्हणाले की, मनसे व आमचे सर्व नगरसेवक एकत्र राहिले असते तर कल्याण-डोंबिवली महापालिकेत एक ताकदीचा विरोधी गट उभा राहिला असता. हा निर्णय घ्यायला नको होता, अशी खंतही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

आणखी वाचा

BMC Mayor BJP-Shivsena Shinde Group: मुंबई महानगरपालिकेत महापौरपद कोणाला, भाजप-शिंदेंच्या शिवसेनेला काय काय मिळणार?; पाहा A टू Z माहिती

आणखी वाचा

Comments are closed.