अमृता फडणवीसांबाबत अंजली भारतींचं आक्षेपार्ह वक्तव्य, ठाकरे गटाचे सगळे नेते फडणवीसांच्या पाठीशी
फडणवीस फडणवीस विकासः गायिका अंजली भारती यांनी भंडाऱ्यातील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांच्याविषयी वादग्रस्त वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर भाजप (BJP) आणि शिंदे सेनेचे नेते आक्रमक झाले होते. अशातच आता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची शिवसेनाही अमृता फडणवीस यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहिली आहे. ठाकरे गटाच्या किशोरी पेडणेकर, अंबादास दानवे, संजय राऊत या सर्व नेत्यांनी अमृता फडणवीस यांच्याविषयीचे वक्तव्य अयोग्य असल्याचे सांगत या प्रकाराच निषेध केला.
सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्याबद्दल गायिका अंजली भारती यांनी जे वक्तव्य केले आहे, त्याचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या महिला आघाडीकून निषेध करत असल्याचे ट्विट ठाकरे गटाच्या मुंबई महानगरपालिकेतील गटनेत्या किशोरी पेडणेकर यांनी केले. संजय राऊत आणि अंबादास दानवे यांनीही अमृता फडणवीस यांच्याविषयीचे वक्तव्य योग्य नसल्याचे म्हटले.
मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप 89 जागा जिंकत सर्वाधिक मोठा पक्ष ठरला होता. मात्र, बहुमतासाठी काही जागा कमी पडत असताना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने दबावतंत्राचे राजकारण सुरु केल्याने देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात पडद्यामागे चर्चा सुरु असल्याची कुजबुज राजकीय वर्तुळात सुरु आहे. मुंबईच्या महापौरपदाच्या निवडणुकीत ठाकरे गटाकडून भाजपला अनुकूल भूमिका घेतली जाईल, अशीही चर्चा होती. त्यामुळे उद्धव ठाकरे हे पुन्हा भाजपच्या जवळ गेल्याची चर्चा रंगली होती. अशातच अमृता फडणवीसांच्या या प्रकरणात ठाकरे गट फडणवीसांच्या पाठी ठामपणे उभे राहिल्याने राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
अमृता फडणवीस आणि अंजली भारती: नेमकम प्रकरण काय?
गायिका अंजली भारती यांनी राज्यातील गुन्हेगारी आणि महिलांवरील बलात्काराच्या घटनांबद्दल बोलताना अमृता फडणवीस यांच्याबद्दल टिप्पणी केली. यावेळी त्यांनी अमृता फडणवीस यांच्याविषयी अत्यंत वाईट भाषा वापरली. त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली होती. शिंदे सेनेचे नेते संजय निरुपम यांनी ट्विट करुन या प्रकाराचा निषेध व्यक्त केला होता. लज्जास्पद विधान! ही महिला मुख्यमंत्र्यांच्या पत्नीवर बलात्काराची वकिली करत आहे. माता आणि बहिणींवरील अत्याचाराला विरोध केला पाहिजे, पण अशा प्रकारे नाही. निषेध! निषेध! निषेध, असे संजय निरुपम यांनी ट्विटमध्ये म्हटले होते.
आणखी वाचा
उदय सामंत एका मोठ्या गटासह भाजपमध्ये जाणार; संजय राऊतांचा मोठा दावा, राजकीय वर्तुळात खळबळ
आणखी वाचा
Comments are closed.