परभणीत भाजप उमेदवाराचा 1 मताने पराभव, निकालानंतर नवा ट्विस्ट; प्रसाद नांगरेंची हायकोर्टात धाव
परभणी : राज्यातील महापालिका निवडणुकांचा (Election) गुलाल उधळून होतो न होतो, तोच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. त्यामुळे, राजकीय पक्षाचे प्रमुख व नेतेमंडळी झेडपीच्या निवडणुकांच्या कामात व्यस्त झाली आहे. मात्र, अद्यापही काहींना आपला पराभव पचत नाही, किंवा पटत नाही हे परभणीतील (Parbhani) एका मताच्या पराभवातील उमेदवाराकडे पाहिल्यावर लक्षात येईल. परभणी महापालिकेतील प्रभाग क्रमांक 1 मध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार व्यंकट डहाळे अवघ्या 1 मताने विजयी झाले आहे. तर भाजपचे उमेदवार प्रसाद नागरे यांचा अवघ्या 1 मताने पराभव झाला. मतमोजणीच्या दिवशी याच एका मताच्या फरकामुळे जवळपास 3 तास वाद सुरू होता. आता, हा वाद न्यायालयात पोहोचला आहे. कारण, पराभूत उमेदवार प्रसाद नागरेंनी हायकोर्टात धाव घेतली आहे.
निवडणूक निकालानंतर येथील प्रभागात तब्बल तीन तास वाद सुरू होता. अखेर निवडणूक निरीक्षक मेघना कावली यांनी सर्व बाबी जाणून घेत उबाठा गटाचे उमेदवार व्यंकट डहाळे यांचा विजय जाहीर केला. त्यानंतर, या निमित्ताने एका मताची किंमत एका उमदेवाराचे भवितव्य ठरवणारी ठरली, या विजयाची राज्यभर चर्चा सुरू झाली होती. आता, या विजयात नवा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. आता, ह्याच निकालाला न्यायालयात आणि निवडणूक आयोगाकडे आव्हान देण्यात आले आहे.
एका मताने काय फरक पडतो अशा टॅगलाईन देऊन परभणी महानगरपालिकेतील प्रभाग क्रमांक एक मधील 1 मताने पराभूत झालेल्या आणि विजयी झालेल्या उमेदवाराचा निकाल राज्यभर गाजला होता. आता, ह्याच निकालाला न्यायालयात आणि निवडणूक आयोगाकडे आव्हान देण्यात आले आहे. येथील महापालिका निवडणुकांमध्ये प्रभाग क्रमांक 1 ची निवडणूक पुन्हा घेण्याची मागणी पराभूत उमेदवाराने केली आहे. ज्या पोस्टल मतातून उबाठा शिवसेनेचा उमेदवार विजयी झाला त्यात 7 पोस्टल मत करणाऱ्या मतदारांचे कुठलेही कागदपत्रे निवडणूक विभागाकडे नाहीत, असा दावा करत हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे.
एका सामान्य मतदाराला पोस्टल मताचा अधिकार देण्यात आला, विजयी उमेदवाराच्या नातेवाईकांनीच या प्रभागात 2 वेळा मतदान केले तसेच इतर नातेवाईकांनी विविध शहरात नगर परिषदेला मतदान करून परभणीत महापालिकेच्या निवडणुकीतही मतदान केल्याचा आरोप प्रतिस्पर्धी पराभूत उमेदवाराकडून करण्यात आला आहे. या आरोपांसह एक ना असे अनेक सर्टिफाईड पुरावे घेऊन भाजपच्या दोन्ही उमेदवारांनी न्यायालयात याचिका दाखल केली. तसेच निवडणूक आयोगाकडे देखील यासंदर्भाने याचिका दाखल करत इथली निवडणूक पुन्हा पारदर्शकपणे घ्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. दरम्यान, या निवडणूक आणि निकाल प्रक्रियेत दोषी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणीही दोन्ही पराभूत उमेदवारांनी केली आहे.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.