प्रफुल्ल पटेल की अजून कुणाचा दादांना फोन आला, त्यानंतर उशीर झाला अन् प्रवासाचा निर्णय बदलला; रा
मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार अपघाताच्या आदल्या दिवशी कारने बारामतीला जाणार होते. त्यासाठी सर्व तयारीही झाली होती, परंतु आयत्या वेळीस एक महत्त्वाचे काम घेऊन प्रफुल्ल पटेल (Praful Patel) आले, त्या कामाला बराच वेळ लागला आणि अजितदादा कार ऐवजी दुसऱ्या दिवशी विमानाने बारामतीकडे रवाना झाले. त्याच विमानाला अपघात झाला आणि आपण अजिदादांना गमावले, अशी धक्कादायक माहिती राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव यांनी दिली. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार जगन्नाथ शिंदे यांच्या पुढाकाराने अजितदादा पवार यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन मंगेशी बैंक्वेट सभागृहात करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते. अजितदादांच्या अपघाताची बातमी आपल्याला फोनद्वारे समजली, लगेचच त्यांच्या स्वीय सहाय्यकांकडून संपूर्ण माहिती घेतली. त्यानंतर पुढील तीन तास चार तास मी सुन्न झालो होतो, मला काहीच समजतं नव्हतं असंही ते म्हणाले.
जिल्हा परिषद निवडणूकीच्या प्रचारासाठी अजितदादा बारामतीमध्ये सभा घेणार होते. सभेला जाण्यासाठी आदल्या दिवशी संपूर्ण तयारी केली. सर्व सामान कारगाडीत भरले, जाण्याची तयारी झाली तेवढ्यातप्रफुल पटेल की आणखी कोणाचातरी एका कुठल्यातरी कामासाठी फोन आला, फाईल आणली. ते काम करता करता उशिर झाला आणि अजितदादांनी मोटारीने जाण्याऐवजी दुसऱ्या दिवशी विमानाने जाण्याचे ठरविले. त्यानंतर अकल्पित घटना घडली, अशी आपल्याला माहिती मिळाल्याचे प्रमोद हिंदूराव यांनी आपल्या श्रध्दांजलीपर भाषणात सांगितले.
सर्व सामान कारगाडीत भरले, जाण्याची तयारी झाली तेवढ्यात….
अजित पवार यांचे बाय रोड जाण्याचे ठरले होते. सर्व बॅगा गाडीत टाकल्या. परंतु त्याचवेळी प्रफुल पटेल की आणखी कुणाचा फोन दादांना आला. मंत्रालयात एक फाईल अडकली आहे. त्याच्यावर सही हवी आहे. म्हणून अजित पवार यांनी सचिवाला फोन केला, ती फाईल लवकर घेऊन ये, पुन्हा मी आठवडाभर नाहीये, असे त्यांनी सचिवाला सांगितले. परंतु फाईल आणायला साडेसात आठ वाजले. मग उशीर झाल्यानंतर त्यांनी ड्रायव्हरला सांगितले की मी विमानाने जातो. गाडीतल्या बॅगा त्यांनी परत काढल्या, आणि ती अघटीत घटना घडली, असे प्रमोद हिंदुराव यांनी सांगितले.
दादांच्या अनेक कामांचे आपण साक्षीदार
अजितदादांबरोबर आपले ३९ वर्षे अतिशय जवळचे संबंध होते, त्यांचा दुसरे दिवशी होणारा कार्यक्रम आपल्याकडे नेहमी पोहचत असे. दादांच्या अनेक कामांचे आपण साक्षीदार आहोत, कल्याणला आपल्या घरी दादा आणि सुनेत्रा वहिनी अनेकदा येऊन गेले. दादांनी शेवटची भेट आपल्या घरी दिली तेव्हा आपण त्यांना माळशेज घाटापर्यंत सोडायला गेलो होतो. त्यासमयी झालेल्या संवादाची माहिती देत हिंदुराव यांनी दादांच्या अनेक आठवणी सांगितल्या.
तो पहिल्यांदाच विमानात दादांच्या शेजारी बसला
अजित पवार यांचा अंगरक्षक विदीप जाधव कधीच अजितदादांच्या शेजारी विमानात बसला नव्हता. तो पहिल्यांदाच विमानात दादांच्या शेजारी बसला, तो फोटो त्याने त्याच्या घरच्यांना पाठवला. तोच फोटो त्यांचा अखेरचा ठरला, असेही प्रमोद हिंदुराव म्हणाले.
आणखी वाचा
Comments are closed.