मोठी बातमी! केंद्रीयमंत्र्यांनी लावली AAIB चौकशी, अजित पवारांच्या विमान अपघाताचे पत्ते उलगडणार

मुंबई : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांच्या विमान अपघाताच्या संदर्भात केंद्रीय उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी एएआयबीची चौकशी लावली आहे. एएआयबी (AAIB) ही स्वतंत्र चौकशी संस्था असून ती केंद्रीय हवाई उड्डान मंत्रालयाच्या अंतर्गत येत नाही. या चौकशी यंत्रणेला जगातील कोणत्याही चौकशी यंत्रणेची मदत मागून या अपघाताची चौकशी करता येते अशी तरतूद आहे. त्यामुळे, राष्ट्रवादी काँग्रेस (राष्ट्रवादी) शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी दोन दिवसांपूर्वी पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले आहेत. तसेच, या घटनेची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर चौकशी झाली पाहिजे, अशीही मागणी त्यांनी केली होती. त्यानुसार, आता चौकशी सुरू झाल्याचे दिसून येते.

राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री असताना एएआयबीची स्थापन करण्यात आली होती. आपल्या देशात विमान दुर्घटनेच्या संदर्भात स्वतंत्र चौकशी करण्याकरिता संघटना पाहिजे म्हणून या चौकशी समितीची निर्मिती करण्यात आली होती. दुर्घटनेतील सत्य समोर आलं पाहिजे आणि अपघातसंदर्भाने मुळात दोनच गोष्टी या चुकीच्या असू शकतील. एकतर वैमानिकाचा दोष किंवा विमानाचा दोष. त्यामुळे अपघाताची सगळी चौकशी झाली पाहिजे अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी आहे. या पलीकडे कोणती चौकशी करण्याची समिती असेल त्याची सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मागणी करेन. पण, एएआयबीला चौकशीचे सर्वाधिकार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी एबीपी माझाला दिली. त्यामुळे, गेल्या काही दिवसांपासून आमदार रोहित पवार यांच्याकडून सातत्याने अपघात की घातपात या अनुषंगाने चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी केली जात असताना आता ही चौकशी सुरू झाल्याचे समोर आलं आहे.

एएआयबी चौकशी होणार

दरम्यान, अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला की घातपात यावरुन शंका उपस्थित होत आहेत. राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून सातत्याने या विमान अपघाताच्या सखोल चौकशीची मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या चौकशीच्या मागणीसंदर्भात नागरी उड्डाण मंत्र्यांना पत्र लिहिले होते. आता, केंद्रीय मंत्रालयाकडून या विमान अपघाताची एएआयबी चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. त्यामुळे, आमदार रोहित पवारांच्या सातत्याच्या मागणीनंतर दुर्घटनेची सखोल चौकशी सुरू झाल्याचं दिसून येतं.

हेही वाचा

मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्षांची 15 दिवसात निवड; सुनेत्रा पवारांच्या नावावरच शिक्कामोर्तब होणार?

आणखी वाचा

Comments are closed.