Ajit Pawar expresses anger over Suresh Dhas statement rrp


राष्ट्रवादी काँग्रेसमधील बडी मुन्नी अमोल मिटकरींसारख्या बारक्या पोरांना बोलायला लावत आहे, असे वक्तव्य भाजपा आमदार सुरेश धस यांनी केले होते. या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार आज प्रश्न विचारला असता त्यांनी सुरेश धस यांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला.

पुणे : बीडचे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी महाराष्ट्र हादरला आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय संशयित वाल्मीक कराड हा पोलिसांनी शरण आला आहे. पण या हत्येची नि:पश्चपणे चौकशी होईपर्यंत धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपा आमदार सुरेश धस आणि विरोधकांकडून होताना दिसत आहे. अशातच सुरेश धस यांनी बुधवारी (8 जानेवारी) या प्रकरणी आरोप करताना राष्ट्रवादी काँग्रेसमधील बडी मुन्नी अमोल मिटकरींसारख्या बारक्या पोरांना बोलायला लावत आहे, असे वक्तव्य केले होते. यानंतर राष्ट्रवादीतील मुन्नी कोण? अशा चर्चांना उधाण आले. या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार आज प्रश्न विचारला असता त्यांनी सुरेश धस यांच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला. ते पुण्यात माध्यमांशी संवाद साधत होते. (Ajit Pawar expresses anger over Suresh Dhas statement)

अमोल मिटकरी यांच्या वक्तव्यावर बोलताना सुरेश धस म्हणाले होते की, मिटकरी हे स्वत:हा बोलत नाहीत. त्यांना कुणीतरी बोलायला लावत आहे. जो कुणी मिटकरींना बोलायला लावत आहे, त्याने स्वत: बोलावं. त्याला फार चांगलं उत्तर मी देईल. खरं तर राष्ट्रवादीतील एक बडी मुन्नी मिटकरींना बोलायला लावत आहे. त्या बड्या मुन्नीला बोल म्हणावं, मिटकरी, सूरज चव्हाणांसारख्या बारक्या पोरांना कशाला बोलायला लावत आहे. मी कुणाबद्दल बोलत आहे, हे मुन्नीलाही माहित आहे. त्यामुळे मुन्नीने पुढे यावे, मुन्नी पुढे आल्यावर त्याची सुन्नी करतो, असा इशारा दिला होता. याचवेळी त्यांनी मुन्नी कोण हे नंतर सांगताे, असेही म्हटले आहे. यासंदर्भात आज अजित पवार यांना विचारले असता त्यांनी सुरेश धस यांनाच जाऊन विचारा, असे प्रत्युत्तर दिले. तसेच संताप व्यक्त करताना कोणी अशा फालतू गोष्टी बोलत असेल तर मी स्पष्ट नावं घेऊन बोलणार आहे. त्यामुळे त्यांना जाऊन विचारा कोण आहे मुन्नी? असा प्रश्नही अजित पवार यांनी व्यक्त केला.

– Advertisement –

हेही वाचा – Ajit Pawar : पक्ष न बघता दोषींवर कारवाई करा; मुंडेंच्या राजीनाम्यावर काय म्हणाले अजित पवार?

मी दोषी असेल तर माझ्यावरही कारवाई करावी

दरम्यान, अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला की, आतापर्यंत ज्या-ज्या मंत्र्यांवर आरोप झाले होते, त्यांनी राजीनामे दिले आहेत. असे असताना धनंजय मुंडेंना वेगळा न्याय का? यावर अजित पवार म्हणाले की, आतापर्यंत खूप जणांवर आरोप झाले आहेत. पण त्या आरोपामध्ये तथ्य आहे की नाही, हे दिसल्याशिवाय राजीनामा देता येत नाही. काही लोकांनी आरोप झाल्यानंतर व्याकून होऊन राजीनामा दिला आहे. पण धनंजय मुंडे याचं स्पष्ट मत आहे, माझा दूरदूरपर्यंत या प्रकरणाची संबंध नाही. कुठल्याही एजन्सीला या प्रकरणाचा तपास द्या. आता तीन एजन्सी तपास करत आहे, त्यात अजून कुठली एजन्सी लावून तपास करायला सांगा, असे धनंजय मुंडे ठामपणे सांगत आहेत. अशावेळी दोषी नसणाऱ्या व्यक्तीवर अन्याय होता कामा नये. त्यामुळे मी पुन्हा हेच सांगतो की, जर कोणी दोषी असेल, मग मी स्वत: दोषी असेल तर माझ्यावरही कारवाई करण्यात यावी, अशी भूमिका अजित पवार यांनी मांडली.

– Advertisement –

हेही वाचा – Anjali Damania : मुंडेंचा राजीनामा गरजेचा; परळीत सापडलेल्या 109 मृतदेहाप्रकरणी दमानियांचे गंभीर आरोप



Source link

Comments are closed.