कोर्टाने राज ठाकरेंच्या भाषणांचा तपशील मागवला, हिंदी भाषिकांविरोधात कथित द्वेषपूर्ण वक्तव्याप्र
मुंबई: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आलेल्या याचिकेच्या सुनवणीदरम्यान उच्च न्यायालयाने अमराठी भाषिकांविरोधात राज ठाकरेंनी (Raj Thackeray) तसेच त्यांच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या कथित द्वेषपूर्ण वक्तव्यांच्या घटनांची माहिती मागवली आहे. याचिकाकर्त्यांकडून या घटनांची माहिती मागवत उच्च न्यायालयाने सुनवणी तहकूब केली. उत्तर भारतीय विकास सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी याप्रकरणी याचिका दाखल करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. याचिकाकर्ते सुनील शुक्ला यांनी याचिकेत त्यांच्या कार्यालयाची मानसैनिकांनी तोडफोड केल्याचा तसेच समाज माध्यमांवर पोस्ट करून त्यांना धमकावण्यात आल्याचा हवाला दिला आहे. प्रसार माध्यमांवरील प्रतिक्रियांमुळे आणि मनसे आणि राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका केल्यानंतर धमक्यांचे सत्र वाढल्याचा सुनील शुक्ला यांचा दावा आहे.
त्यांना ठार मारण्याच्या धमक्या देणाऱ्या पोस्टचा उल्लेख
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे व त्यांच्या पक्षातील कार्यकर्त्यांनी हिंदी भाषिकांविरोधात केलेल्या द्वेषपूर्ण भाषणांच्या कथित घटनांचा तपशील गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने मागवला आहे. राज्यात ‘उत्तर भारतीय विरोधी’ मोहिमेला विरोध केल्याने आपल्याला लक्ष्य केले आहे, असा आरोप उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी याचिकेमध्ये केला आहे. मुख्य न्या. श्री चंद्रशेखर व न्या. गौतम अंखड यांच्या खंडपीठापुढे गुरुवारी या याचिकेवर सुनावणी पार पडली. न्यायालयाने शुक्ला यांनी नमूद केलेल्या घटनांची माहिती अधिक तपशिलात न्यायलयाने मागवत ही सुनावणी तहकूब केली. याचिकेत २०२४-२५ मधील काही घटनांचा उल्लेख केला आहे. सुमारे ३० मनसेशी संबंधित व्यक्तींनी त्यांच्या पक्ष कार्यालयावर तोडफोड करण्याचा प्रयत्न केल्याचा तसेच त्यांना ठार मारण्याच्या धमक्या देणाऱ्या पोस्टचा उल्लेख केला आहे.
त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना पोलिस संरक्षण मिळावे
शुक्ला यांनी राज ठाकरे व धमक्या देणाऱ्या व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करून तपास करण्याचे निर्देश देण्याची मागणी केली. तसेच त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना पोलिस संरक्षण मिळावे. तसेच हे प्रकरण प्रलंबित असताना राज ठाकरे यांना प्रक्षोभक वक्तव्ये करण्यास मनाई करावी व पक्षाची मान्यता रद्द करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाला द्यावेत, अशा मागण्या शुक्ला यांनी याचिकेद्वारे केल्या आहेत.
राज ठाकरे व मनसेविरोधात याचिका केल्यानंतर त्यांना अधिक धमक्या
शुक्ला यांच्या म्हणण्यानुसार, आपण वृत्तवाहिन्यांवर झळकल्यानंतर तसेच सर्वोच्च न्यायालयात राज ठाकरे व मनसेविरोधात याचिका केल्यानंतर त्यांना अधिक धमक्या देण्यात आल्या आहेत. गुढीपाडवा मेळाव्यातील राज ठाकरे यांच्या भाषणानंतर बँका, मॉल्स आदी ठिकाणी मराठी न बोलणाऱ्या हिंदी भाषिक कर्मचाऱ्यांना लक्ष्य करण्यात आले आणि त्यांच्यावर हल्ले करण्यात आले. मुख्यमंत्री, पोलिस महासंचालक, मुंबई पोलिस आयुक्त, राज्यपाल, केंद्रीय गृहमंत्री आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना तक्रारी व ई-मेल पाठवूनही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही, असे याचिकेत म्हटले आहे. प्रशासनाची ही निष्क्रियता म्हणजे राज्यघटनेतील त्यांच्या मूलभूत हक्कांचे उल्लंघन असल्याचा दावा याचिकेत केला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची १० वाजता बैठक
महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाची १० वाजता बैठक आहे. राज ठाकरे यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडणार आहे. मराठी भाषा दिनाच्या नियोजनाची आज १० वाजता शिवतीर्थवर बैठक आहे.
आणखी वाचा
Comments are closed.