जखमी कार्यकर्त्यांची काळजी घ्या, कसलीही कसर ठेवू नका; पुण्यातील भाजपच्या राड्यानंतर हर्षवर्धन स

पुणे भाजप काँग्रेस राधा: पुण्यात भाजप (BJP) आणि काँग्रेस (Congress) कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या जोरदार झटापटीनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांनी तातडीने दखल घेतली आहे. या घटनेची सविस्तर माहिती घेण्यासाठी सपकाळ यांनी पुणे काँग्रेस शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्याशी फोनवरून संपर्क साधला. तसेच या राड्यात जखमी झालेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांचीही त्यांनी थेट फोन करून विचारपूस केली.

फोनवर बोलताना सपकाळ यांनी अरविंद शिंदेंना स्पष्ट सूचना दिल्या. “जखमी कार्यकर्त्यांच्या उपचारांची संपूर्ण जबाबदारी घ्या. त्यांच्या दवाखान्याची, तपासण्यांची योग्य काळजी घ्या. कोणतीही कसर राहू देऊ नका,” असा सल्ला त्यांनी दिला.

Pune BJP Congress Rada: भाजपच्या दगडफेकीत काँग्रेस कार्यकर्ता जखमी

या राड्यात भाजपकडून करण्यात आलेल्या दगडफेकीत काँग्रेसचा एक कार्यकर्ता गंभीर जखमी झाला आहे. त्याच्या डोक्याला सात टाके पडले असून प्राथमिक उपचारानंतर त्याला घरी सोडण्यात आले आहे. मात्र, सीटी स्कॅन करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला असल्याची माहिती काँग्रेसकडून देण्यात आली आहे.

Pune BJP Congress Rada:  सपकाळांच्या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण तापले

दरम्यान, हर्षवर्धन सपकाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यांच्याबाबत केलेल्या तुलनेनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या वक्तव्याच्या निषेधार्थ पुण्यात भाजपकडून आंदोलन करण्यात येत असतानाच भाजप व काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला होता.

Pune BJP Congress Rada: ‘माझ्या वक्तव्याची मोडतोड करण्यात आली’ – सपकाळ

या घटनेनंतर सपकाळ यांनी सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. त्यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत म्हटले की, “माझ्या वक्तव्याची मोडतोड करून ‘ध’ चा ‘मा’ करण्यात आला. देवेंद्र फडणवीस यांना राज्यात दंगली घडवायच्या आहेत, असे मी आधीच सांगितले होते. त्याचा प्रत्यय आज पुण्यात आला, पुण्यातील भाजपच्या गुंडांनी पोलिसांच्या उपस्थितीत काँग्रेस कार्यालयावर हल्ला करत दगडफेक केली. यात काँग्रेसच्या महिला कार्यकर्त्या आणि पत्रकार भगिनींवर प्राणघातक हल्ला झाला. या भाजपच्या गुंडगिरीचा आम्ही तीव्र निषेध करतो,” असे सपकाळ म्हणाले.

Pune BJP Congress Rada: भाजप-काँग्रेस नेत्यांवर गुन्हे दाखल

हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ भाजप कार्यकर्ते पुण्यात रस्त्यावर उतरले होते. काँग्रेस भवनासमोर आंदोलन सुरू असतानाच काँग्रेस कार्यकर्तेही तेथे जमा झाले. घोषणाबाजीदरम्यान शाब्दिक वाद झाला आणि त्याचे रूपांतर थेट दगडफेकीत झाले. या दगडफेकीत काही वाहनांच्या काचा फुटल्या, तर एक काँग्रेस कार्यकर्ता गंभीर जखमी झाला. काही पोलिसांनाही दगड लागल्याची घटना घडली होती. पुण्यात झालेल्या आंदोलनादरम्यान झालेल्या दगडफेकीमुळे भारतीय जनता पार्टी आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या नेत्यांवर गुन्हे दाखल झाले आहेत. दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांनी परस्परविरोधी तक्रारी दिल्यानंतर पुण्यातील दोन वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे नोंदवण्यात आले. भाजपच्या तक्रारीनुसार काँग्रेसचे नेते अरविंद शिंदे आणि प्रशांत जगताप यांच्यासह इतर कार्यकर्त्यांवर शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल झाला आहे. तर काँग्रेसकडून दिलेल्या तक्रारीनंतर भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे, युवा मोर्चाचे शहराध्यक्ष दुष्यंत मोहोळ यांच्यासह सुमारे 100 जणांवर विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी वाचा

Pune BJP Congress Rada: धीरज घाटे, मंजुषा नागपुरेंना अटक करा, नाहीतर पोलिसांनी बांगड्या घालून घरी बसावं, काँग्रेस कार्यकर्ते पोलिसांवर संतापले, इकडे भाजप कार्यकर्त्यांचा काँग्रेस भवनासमोरुन काढता पाय

आणखी वाचा

Comments are closed.