‘हर्षवर्धन सपकाळ सोलापुरात आल्यास आम्ही त्यांचा चौरंग करू’, सकल हिंदू समाजाचा थेट इशारा

हर्षवर्धन सपकाळ: सोलापुरात (Solapur) काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshvardhan Sapkal) यांच्या वक्तव्याविरोधात सकल हिंदू समाज (Sakal Hindu Samaj) आक्रमक झाला आहे. जिल्हापरिषद कार्यालयासमोर संघटनेच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. “हर्षवर्धन सपकाळ सोलापुरात आल्यास आम्ही त्यांचा चौरंग करू,” असा थेट इशारा कार्यकर्त्यांनी दिल्याने वातावरण तापले आहे.

Tipu Sultan Controversy: वादाची ठिणगी कशी पडली?

मालेगाव महापालिकेतील उपमहापौरांच्या दालनात टिपू सुलतानाचा फोटो लावण्यात आला होता. हिंदुत्ववादी संघटनांनी आक्षेप घेतल्यानंतर तो फोटो हटवण्यात आला. यानंतर सपकाळ यांनी केलेल्या वक्तव्यामुळे वादाला नवे वळण मिळाले. सपकाळ यांनी “टिपू सुलतान यांना छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या समकक्ष पाहिले पाहिजे. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी शौर्य आणि स्वराज्य असा विचार दिला, अगदी त्याचप्रमाणे टिपू सुलतान यांनी त्याच समकक्ष काम केलं, असं सपकाळ म्हणाले होते. या विधानावरून राज्यभरात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. सपकाळ यांच्या वक्तव्याचा भाजप आणि शिवसेनेने तीव्र समाचार घेतला होता.

Sakal Hindu Samaj: सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांची आक्रमक भूमिका

आता सोलापुरात सकल हिंदू समाजाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतल्याचे पाहायला मिळाले. कार्यकर्त्यांनी सपकाळ यांच्याविरोधात घोषणाबाजी करत तीव्र संताप व्यक्त केला. “हर्षवर्धन सपकाळ सोलापुरात आल्यास आम्ही त्यांचा चौरंग करू,” असा थेट इशारा कार्यकर्त्यांनी दिल्याने वातावरण तापल्याचे पाहायला मिळत आहे. दरम्यान, सोलापूर जिल्हा परिषद कार्यालयाच्या समोर सकल हिंदू समाजाचे आंदोलन सुरु असताना काही कार्यकर्त्यांनी पुतळा दहन करण्याचा प्रयत्न केले. मात्र, पुतळा आंदोलनस्थळी आणण्यापूर्वीच पोलिसांनी पुतळा ताब्यात घेतल्याचे पाहायला मिळाले.

Harshvardhan Sapkal: हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा निषेधार्थ मालेगावात आंदोलन

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज व टिपू सुलतानाच्या तुलनेबाबत वक्तव्याच्या निषेधार्थ मालेगावात आज सकल हिंदू समाजाच्या वतीने हर्षवर्धन सपकाळ व टिपू सुलतानाच्या प्रतिमेला जोडे मारत आंदोलन केले. यावेळी सकल हिंदू समाजाच्या वतीने जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला. उपमहापौर दालनात पुन्हा फोटो लागल्यास तो फोटो काढून फेकण्यात येईल, असा इशारा सकल हिंदू समाजाच्या वतीने देण्यात आलाय. यावेळी मोसम पूल येथून मोर्चा काढत छावणी पोलिस ठाणे यांना निवेदन देण्यात आले.

आणखी वाचा

Malegaon News : टिपू सुलतान यांच्या सैन्यात अनेक प्रमुख हे ब्राह्मण, संविधानात ज्यांचा फोटो तो हटविण्याचा अधिकार भाजपला कोणी दिला? मालेगावच्या उपमहापौर पुन्हा कडाडल्या

आणखी वाचा

Comments are closed.