मुलींना कट मारण्याचा स्टंट; भीषण अपघातात 19 वर्षीय दोन तरुणांचा मृत्यू, नागपूरमधील घटना
नागपूर : अलिकडील तरुणाई रिल्स बनवण्याच्या नादात अनेक स्टंट करतात, तर अनेकवेळा मुलींसमोर रुबाब दाखवण्यासाठीही हु्ल्लडबाजी करतात. नागपूरमध्ये (Nagpur) स्टंटबाजी करताना आणि मुलीला कट मारुन भरधाव वेगाने पुढे जाण्याच्या नादात बुलेटवरील दोन तरुणांचा भीषण अपघात (Accident) झाला. या अपघातात दोन्ही तरुणांचा जीव गेल्याची धक्कादायक घटना घडली.
नागपूरमध्ये भरधाव स्टंटबाजीचा शेवट दुर्दैवी ठरला आहे. नागपूर शहरातील काचिपुरा परिसरात रात्री उशिरा झालेल्या भीषण अपघातात दोन तरुणांचा मृत्यू झाला. वर्धा मार्गावरील जनता चौक ते बजाजनगर चौकदरम्यान बुलेटवरून वेगात फेऱ्या मारत सिग्नल जंप करत असताना हा अपघात घडला. शहरातील विष्णूजी की रसोई समोर एका महिला दुचाकीस्वाराला कट मारताना चालकाचा ताबा सुटला आणि बाईक थेट रस्त्याकडील पिलरवर आदळली. या धडकेत 19 वर्षीय युग विशाल चनकापूरे आणि 19 वर्षीय रुद्र शशिकांत सोमकुंवर या दोघा कबड्डीपटूंचा जागीच मृत्यू झाला. स्थानिक नागरिकांनी त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या प्रकरणाचा पुढील तपास बजाज नगर पोलीस ठाणे करत आहेत.
हेही वाचा
हर्षवर्धन सपकाळांकडून शिवप्रेमींची दिलगिरी; भाजपचा खोडसाळपणा म्हणत वक्तव्याचा अर्थही समजावला
आणखी वाचा
Comments are closed.