राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून CBI चौकशीची मागणी; सुनिल तटकरेंची रवींद्र चव्हाणांसोबत ZP पे चर्चा
मुंबई : राष्ट्रवादीचे दिवंगत नेते अजित पवार (Ajit pawar) यांच्या निधनानंतर राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदी सुनेत्रा पवार यांनी पदभार स्वीकारला असून कामालाही सुरुवात केली आहे. दुसरीकडे पक्षाच्या संघटनात्मक बैठका आणि पक्षबांधणीच्या अनुषंगाने देखील त्या सक्रीय झाल्याचं दिसून येत आहे. पुढील आठवड्यातच राष्ट्रीय अध्यक्षपदीही सुनेत्रा पवार पदभार स्वीकारणार असल्याची माहिती आहे. त्यातच, राज्यात झालेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस भाजपविरोधात सत्ता स्थापन करत असल्याची चर्चा आहे. त्याच अनुषंगाने आज भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे (Sunil tatkare) यांची भेट घेऊन चर्चा केली.
सुनिल तटकरे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना, भेटीतील चर्चेबाबत माहिती दिली. आमची मुख्यमंत्र्यांसोबत भेट झाली, त्यानंतर आज रवींद्र चव्हाण आता भेटण्यास आले होते. जिल्हा परिषद निवडणूक झाली असून अनेक ठिकाणी एकत्र जाण्यासंदर्भात चर्चा केल्याचे तटकरे यांनी सांगितले. पुढील काळात अनेक ठिकाणी आम्ही एकत्र सत्ता स्थापन करणार आहोत. आमदारांनी कुठलीही नाराजी व्यक्त केली नाही. पुढील काळात पक्ष संघटना काम करण्याबाबतही आमच्यात चर्चा झाली.
अजित दादांचा मृत्यू अपघाती झाला की घातपात यासंदर्भाने चौकशीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले. तसेच, संबंधित अपघाताची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी केल्याचेही सुनिल तटकरे यांनी सांगितले.
सीबीआय चौकशीबाबत अमित शाहांकडे मागणी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी, अजित पवार यांच्या अपघात प्रकरणाची सीबीआय मार्फत चौकशी करावी या आशयाचं पत्र मुख्यमंत्र्यांना देण्यात आलं. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पार्थ पवार, प्रफुल पटेल, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ यांची उपस्थिती होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून संबंधित प्रकरणी गृहमंत्री अमित शाह यांना सीबीआय चौकशी करण्याबाबत तसेच अपघाताची नेमकी कारणे समोर आणण्याबाबत विनंती करण्याचे आश्वासन देण्यात आले.
मंत्री कार्यालयात वाईट बाब खपवून घेणार नाही
नरहरी झिरवाळ यांच्या कार्यालयात लिपिकास लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आल्याची घटना गंभीर आहे. त्यामुळे, मंत्री कार्यालयात कोणतीही वाईट बाब खपवून घेतली जाणार नाही अशा सूचना संबंधितांना दिल्या आहेत. तसेच, अजित दादांच्या निधनानंतर 75 शाळांसदर्भातील फाईलींवर घाईघाईने सह्या करत खिरापत वाटण्यात आल्याबाबतही तटकरे यांनी मत मांडले. अल्पसंख्याक विभागाकडून संबंधित चुकीचं काम करणाऱ्यांवर थेट कारवाई केलीच पाहिजे, अशी भूमिका तटकरे स्पष्ट केली.
हेही वाचा
‘ठाणे की रिक्षा’वाला कुणाला कामरा विधानभवनात; सोबत सुषमा अंधारे अन् वकील, अंगावर लक्षवेधी टी-शर्ट
आणखी वाचा
Comments are closed.