2026चे वर्ष दोन्ही देशांसाठी ट्रर्निंग पाँईंट; PM मोदींचं फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांसमोर भाषण
मुंबई : फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन (Macron) यांचे आज मुंबई (मुंबई) स्वागत करण्यात आले. राज्यपालांसह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई विमानतळावर त्यांचे स्वागत केले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकभवन येथे मॅक्रोन यांची भेट घेतली. या भेटीनंतर दोन्ही देशाच्या प्रमुखांना पत्रकार परिषदेला संबोधित केले. यावेळी, इमॅन्युएल मॅक्रोन यांचे मुंबईत स्वागत करताना मला आनंद होतोय, एआय समिटसाठी मला फ्रान्समध्ये बोलवलं होतं, असे म्हणत मोदींनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या समुद्रातील उडीची आठवणही सांगितली.
फ्रान्सचं सर्वात मोठं पोर्ट ज्यातून भारतातील सैनिकांनी पहिल्या विश्व युद्धात आपले पाऊल टाकले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी उडी घेतली, त्या समुद्राजवळील हे शहर आहे. मला त्यांना अभिवादन करण्याचे सौभाग्य गतवर्षी मिळाले होते. भारताच्या गेट वे मध्ये आज मॅक्रोन यांचे स्वागत आपण करतोय, असे म्हणत मोदींनी मॅक्रोन यांचे मुंबईसह भारतात स्वागत करताना जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. भारत-फ्रान्स यांचे संबंध अतिशय जुने आहेत, आपल्या भागिदारीला अधिक दृढ करण्याचा प्रयत्न आपण करतोय. ग्लोबल स्टॅबिलिटी आणि विकासाची ही भागीदारी आहे. भारतात हेलिकॉप्टर निर्मितीचे उद्घाटन त्याचेच उदाहरण आहे. भारत माऊंट एव्हरेस्टपर्यंत पोहोचणार हेलिकॉप्टर बनवणार आहे, आणि निर्यात देखील करणार आहे, असे नरेंद्र मोदींनी म्हटले.
यंदाचे 2026 चे वर्ष दोन्ही देशांसाठी ट्रर्निंग पाँईंट आहे, आम्ही युरोप सोबत फ्री ट्रेड ॲग्रीमेंट केलय. याला गती देण्यासाठी आपणास नक्कीच फायदा होणार आहे. दुप्पट कर न देण्यासाठी आपल्याला याचा फायदा होईल, असे मोदींनी म्हटले. इंडिया-फ्रान्स इनोव्हेशनच्या माध्यमातून लोकांचा सहभाग वाढवण्यावर भर असणार आहे. संरक्षण, क्लीन एनर्जी, स्पेसच्या माध्यमातून उद्योजक, स्टार्टअप्सला जवळ आणण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. सोबतच, संशोधन केंद्रांची उभारणी देखील केली जाईल. एआय इन हेल्थ, डिजिटल सायन्स इन टेक्नोलॉजी आणि एरोनॉटिक्सची उभारणी आपण करणार आहोत, असेही मोदींनी यावेळी म्हटले.
इंडिया-फ्रान्स भागीदारी ग्लोबल फोर्स भागीदारी आहे, विश्वस्त तंत्रज्ञान आम्ही विकसित करतोय. मल्टिलेव्हल डायलॉगच्या माध्यमातून ह्या सर्वांची उभारणी करणार आहोत. युक्रेन, पश्चिम आशिया किंवा इंडो पॅसिफिकमध्ये शांतीचे आपण समर्थन करतो. तसेच, आतंकवाद दहशतवाद संपवण्याचेही आमचे प्रयत्न असेल. भारताच्या संस्कृतीला जवळ आणण्यासाठी फ्रान्समध्ये विवेकानंद सांस्कृतिक केंद्राची उभारणी करण्यात येणार असून एका नव्या अध्यायाचा शुभारंभ आम्ही करतोय, असेही मोदींनी म्हटले.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.