भिवंडीत महापौरपदाच्या निवडणुकीपूर्वी राजकीय हालचालींना वेग, शिंदे भाजपचे नगरसेवक गळाला लावणार?

भिवंडी महानगरपालिका महापौर निवड भिवंडी महानगरपालिकेत महापौरपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठ्या राजकीय घडामोडी सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. कोणार्क विकास आघाडीचे माजी महापौर विलास पाटील (Vilas Patil) आणि भाजपमध्ये झालेल्या राड्यानंतर विलास पाटील यांना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने (Shivsena) जवळ केले होते. त्यांना सोबत घेऊन शिवसेना स्वत:चा महापौर बसवण्याचा प्रयत्न करत असल्याने भाजपच्या (BJP) गोटात तीव्र  नाराजी पसरली आहे. त्यामुळे महापौरपदाच्या निवडणुकीत भाजप शिवसेनेला मदत करणार नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

मात्र, शिवसेनेकडून बहुतमासाठी लागणारे संख्याबळ जुळवण्याच्या जोरदार हालचाली सुरु आहेत. बहुमताचा आकडा जमवण्यासाठी शिवसेना आणि भाजपमध्ये शर्यत लागली आहे. त्यासाठी भाजपमधील नाराज नगरसेवकांना शिवसेनेकडून फोडण्याचे प्रयत्न केले जात आहेत. भाजपचे अनेक नगरसेवक शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. भिवंडी महानगरपालिका निवडणुकीला निकाल 16 जानेवारीला लागला होता. मात्र, आता एक महिना उलटून गेल्यानंतरही भिवंडी महानगरपालिकेत सत्तास्थापना झालेली नाही. परिणामी अजून याठिकाणी महापौर बसलेला नाही. येत्या 20 तारखेला भिवंडीत महापौरपदाची निवडणूक होईल. त्यापूर्वी भिवंडीत फोडाफोडीच्या राजकारणाला वेग आला आहे.

भिवंडी पालिकेची सार्वत्रिक निवडणूक भाजपा व शिवसेनेने महायुती म्हणून लढवली होती. यामध्ये भाजपाचे 22 व शिवसेनेचे 12 असे एकत्र महायुती म्हणून 34 सदस्य निवडून आले होते. परंतु बहुमतासाठीचा 46 ही संख्या जमवण्यात भाजपाला अपयश येत असतानाच शिवसेनेने कोणार्क विकास आघाडीचे विलास पाटील यांच्या सोबतीने महापौरपदासाठी  जुळवाजुळव सुरू केली होती. मात्र, विलास पाटील यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने अटक केल्यामुळे भिवंडीच्या राजकारणात नवा ट्विस्ट आला होता. विलास पाटील यांना अटक झाल्यानंतरही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने भिवंडीत महानगरपालिकेत आपला महापौर बसवण्याचे प्रयत्न सोडलेले नाहीत.

Bhiwandi MahanagarPalika Election: भिवंडी महानगरपालिकेतील संख्याबळ

एकूण जागा-90

काँग्रेस-30
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट-12
भाजप-22
शिवसेना-12
कोणार्क विकास आघाडी-4
समाजवादी पक्ष-6
अपक्ष-1

Nashik Mahangarpalika news: नाशिक महापालिका सभागृह नेते आणि स्थायी समिती सभापती पदासाठी भाजपमध्ये लॉबिंग

नाशिकमध्ये  महापौर आणि उपमहापौर पदाच्या शर्यतीत अपयशी ठरलेल्या नगरसेवकांनी स्थायी समिती सभापतीपदासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे. शिवसेनेला उपमहापौरपद बहाल केल्याने ऐनवेळी संधी गमावलेले मच्छिंद्र सानप स्थायी समिती सभापतीपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. सभागृह नेते पदासाठी नव्याने पक्षात दाखल झालेले सुधाकर बडगुजर, गुरमित बग्गा, दिनकर पाटील  यांच्या नावाची चर्चा आहे. समिती पदांच्या वाटपात जुने आणि नव्याची सांगड घातली जाणार आहे. येत्या 20 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या महासभेच्या पार्श्वभूमीवर भाजप नगरसेवकांची बैठक होणार आहे. या बैठकीत महासभेत कोणते मुद्दे मांडायचे यासंदर्भात चर्चा होईल.

आणखी वाचा

भिवंडी महापौर निवडणुकीपूर्वी मोठी राजकीय घडामोड, ‘किंगमेकर’ विलास पाटलांना पोलिसांनी उचललं, नेमकं काय घडलं?

आणखी वाचा

Comments are closed.