भिगवणमधील तरुणीच्या अपहरणप्रकरणात नवा ट्विस्ट; मुलासोबत मोबाईलवर संभाषण, मेसेजवरही बोलायची; पोल
पुणे: दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे एका २१ वर्षीय तरुणीचे भररस्त्यात अपहरण (Pune Crime News) केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी आपल्या आई आणि भावासोबत दुचाकीवरून जात होती. यावेळी त्यांची दुचाकी अडवली. काही कळण्याच्या आतच आरोपींनी आई आणि भावाच्या डोळ्यात लाल (Pune Crime News) तिखट फेकले. डोळ्यांची प्रचंड आग होऊ लागल्याने त्यांना काहीही दिसणं अशक्य झालं. याच संधीचा फायदा घेत आरोपींनी तरुणीला जबरदस्तीने सोबत घेतले आणि तिथून पळ काढला. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (Pune Crime News)
या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, लग्नाची खरेदी करून जात असताना भावाच्या आईच्या डोळ्यात चटणी टाकून मुलीचा अपहरण करण्यात आलं. रात्री मोठ्या संख्येने पोलीस ठाण्याबाहेर जमाव जमला (Pune Crime News) होता. पोलिसांनी लवकरात लवकर आरोपींना अटक करावी या मागणीसाठी भिगवण बंदची हाक देण्यात आली आहे. रात्री पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या दिल्यानंतर पुणे सोलापूर हायवे रोखून (bhigwan kidnapping case) धरण्यात आला. अपहरण झालेल्या मुलीचे आणि मुलांचे घर शेजारी-शेजारी आहे. दोघांच्यात एक महिनाभरापासून फोनवर बोलणं होतं होतं. मुलीचे वय 21 वर्ष आहे, या घटनेनंतर पोलिसांनी मुलीला शोधण्यासाठी सहा पथके रवाना केली आहेत. पोलिसांनी 165 किलोमीटरचा रूट मॅप केला आहे. यामध्ये कोणताही धार्मिक ते निर्माण होऊ नये याची खबरदारी प्रत्येकाने घ्यावी, कोणत्याही प्रकारचे मोर्चे काढू नयेत असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. जर कुणी अशा पद्धतीचे वर्तन केलं तर त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात येईल अशी सूचना देखील पोलिसांनी दिली आहे.(Pune Crime News)
पोलिसांनी काय दिली माहिती
याबाबत अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी माहिती देताना सांगितलं की, किडनॅपिंगची केस आमच्याकडे आली आहे, या अनुषंगाने किडनॅपिंग आणि जबरी चोरी अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झालेले दोन आरोपी निष्पन्न झाले आहेत. जहीर शेख आणि अयान शेख या दोन सख्ख्या भावांचा या घटनेमध्ये समावेश आहे. यामध्ये जे पीडित आहे ते आणि आरोपी या दोघांनी एकमेकांना फोन आणि टेक्स्ट मेसेज केल्याचंही समोर आलं आहे. हे सर्व तपासामध्ये आढळलं आहे, त्या अनुषंगाने काल घटनेनंतर आम्ही चार टीम रवाना केल्या होत्या, सर्वांचे फोन अद्यापही बंद आहेत आणि आमच्या टीम ज्या रवाना झाले आहेत, त्या सीसीटीव्हीच्या अनुषंगाने तपास करत आहेत .
मी सर्व संघटनांना आवाहन करतो की, कोणत्याही पद्धतीच्या अफवांना बळी पडू नये, बेकायदेशीर किंवा चुकीच्या गोष्टी कोणीही करू नये. पोलीस तपास करत आहेत. यामध्ये जे काही सत्य आहे ते उजेडात येईल. त्यामुळे सर्वांनी शांतता राखावी पोलीस प्रशासन तपास करत आहे.
12 जानेवारी ते 12 फेब्रुवारी दरम्यानचे आम्ही त्यांचे कॉल डिटेल्स मागवले आहेत. त्या दरम्यान त्यांचे कॉल झालेले दिसत आहेत. टेक्स्ट मेसेज झालेले दिसत आहेत. हे फक्त रेगुलर सिम कार्ड वरून झालेला आहे. व्हाट्सअप चा डाटा अद्याप मिळालेला नाही, त्याची माहिती मागवलेली आहे, त्यामधून काही माहिती समोर येण्याची शक्यता आहे. दोघेही एकमेकांच्या शेजारी राहतात. लहानपणापासून त्यांचे एकमेकांशी ओळख आहे. यामध्ये दोन वेगवेगळ्या धर्मांचा अँगल आहे. या घटनेचा सखोल तपास सुरू आहे. मी नागरिकांना आवाहन करतो की आंदोलने मोर्चे करू नयेत. आरोपींना अटक करण्यात येईल. या संदर्भातल्या ज्या प्राथमिक तपासातल्या बाबी समोर आल्या आहेत. त्या अनुषंगाने पोलीस तपास करत आहेत. त्यावर लक्ष द्यावं बाकी. आंदोलने वगैरे करू नयेत असं मी आवाहन करतो, आम्ही सध्या सीसीटीव्ही तपासून त्या दृष्टीने तपास करत आहोत. त्या रूटने गेलेले आहेत. त्या रूट चा तपास करत आहोत, आमच्या टीम वेगवेगळ्या मार्गाने त्यांचा तपास करत आहेत. लवकरच आम्ही त्यांना ताब्यात घेऊ असेही पुढे पोलिसांनी माहिती देताना सांगितला आहे.
आतापर्यंत या प्रकरणात काय झालं?
– काल दुपारी साडे तीनच्या दरम्यान लग्नाची खरेदी करून जात असताना भावाच्या आईच्या डोळ्यात चटणी टाकून मुलीचा अपहरण करण्यात आलं.
– रात्री मोठ्या संख्येने पोलीस ठाण्याबाहेर जमाव जमला होता.
– पोलिसांनी लवकरात लवकर आरोपींना अटक करावी या मागणीसाठी भिगवन बंदची हाक देण्यात आली.
– रात्री पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या दिल्यानंतर पुणे सोलापूर हायवे रोखून धरण्यात आला.
– अपहरण झालेल्या मुलीचे आणि मुलाचे घर शेजा शेजारी आहे.
– दोघांच्यात एक महिनाभरापासून फोनवर बोलणं होत होतं असे कॉल डिटेल्स पोलिसांनी काढलेत.
– व्हाट्सअपच्या माध्यमातून काय बोलणं झालं हे पोलीस काढत आहेत.
– मुलीचे वय 21 वर्ष आहे.
– अद्यापही मुलीचा शोध लावण्यात पोलिसांना यश आलं नाही.
– अपहरण झालेल्या मुलीचे 22 तारखेला लग्न आहे
– आई, भाऊ आणि ती लग्नाच्या खरेदीवरून घरी जात असताना अपहरण
– आरोपी आणि अपहरण झालेली मुलगी एकमेकांना लहानपणापासून ओळखतात
– शोधासाठी पोलिसांनी सहा पथके रवाना केली आहेत
– पोलिसांनी 165 किलोमीटरचा रूट मॅप केला आहे
– यामध्ये कोणताही धार्मिक ते निर्माण होऊ नये याची खबरदारी प्रत्येकाने घ्यावी
– कोणत्याही प्रकारचे मोर्चे काढू नयेत असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे
– जर कुणी अशा पद्धतीचे वर्तन केलं तर त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले
– पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली आहे
आणखी वाचा
Comments are closed.