VSR कंपनीच्या मालकाच्या मुलाच्या लग्नाला मोठे नेते हजर; चांगले संबंध म्हणून वाचवण्याचा प्रयत्न

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar Plain Crash) यांच्या विमान अपघातासंदर्भात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत याबाबतचे विविध मुद्दे मांडत माहिती सांगितली आहे. आमदार रोहित पवार म्हणाले की, अजित पवारांच्या अपघाताचा जी यंत्रणा तपास करतेय त्यावर माझा आक्षेप आहे. अतिशय संथ गतीने तपास सुरू आहे. अपघात की घातपात हा मुद्दा अजूनही कायम राहतो, असंही पवार म्हणालेत. व्हिएसआर कंपनीवर कारवाई का केली जात नाही? यावर रोहित पवार बोलले. राजकीय लोक व्हिएसआर कंपनीवर मुद्द्याम कारवाई करत नाहीत, कारण त्यांचे काही संबंध आहेत. अजित पवार सत्तेत होते राज्यातील मोठे नेते होते. मात्र, तरीही राज्यातील सत्ताधारी शांत आहेत.असे रोहित पवार यांनी म्हटले.(No Action Against VSR Company Says Rohit Pawar)

व्हीएसआरच्या मालकाच्या मुलाच्या लग्नाला ते राजस्थानला गेले

त्याचबरोबर पुढे बोलताना रोहित पवारांनी म्हटलं की, आम्ही पाहत होते की व्हीएसआर (VSR) कंपनीवरती कारवाई का होत नाही? याच्या खोलात गेल्यानंतर आम्हाला कळालं की, रोहित सिंग जो व्ही. के. सिंगचा जो मुलगा आहे, भारी भारी गाड्या त्याच्याकडे आहेत. पाच स्पोर्टस कार आहेत, एका एका गाडीची किंमत ७ कोटी आहेत, त्याच्या एकूण ३५ कोटींच्या गाड्याच आहेत. मुंबईचं त्यांचं जे डेलचं गेस्ट हाऊस आहे, तिथे दोन तीन गाड्या लावलेल्या आहेत. बाकी कुठे आहेत माहिती नाही. या रोहित सिंगचं लग्न दीड ते दोन वर्षांपूर्वी होतं, मेरीयेट हॉटेलला जयपुरला राजस्थामध्ये, तिथे कोण कोण गेलं होतं, काहीचे फोटो आहेत, पण ते आम्ही वापरणार नाही, काही लोक जातात लग्नाला, आमचं हे म्हणणं नाही की घातपात करणारे लोक तिथे गेले होते, असं आमचं म्हणणं नाही, पण व्हीएसआर वरती सखोल तपास का होत नाही, पण कदाचित असं असू शकतं, रोहित सिंगच्या लग्नाला महाराष्ट्रातून काही जण गेले होते, नेते होते, माजी मंत्री होते, काही राज्यातील देखील गेले होते,  एक राज्यातील नेते आम्हाला कळले आहेत, आंध्राचे प्रमुख टीडीपी पक्षाचे प्रमुख नेते ते कोण मी सांगणार नाही, मला माहिती आहेत. व्हीएसआरच्या मालकाच्या मुलाच्या लग्नाला ते राजस्थानला गेले होते, तुम्ही तिथं राजस्थानला लग्नाला जाता, आज जेव्हा व्हीएसआर कंपनीवर ऑब्जेक्शन घ्यायचं असतं, ते जे ऑपरेशन बंद करायचे असतात तेव्हा टीडीपी पक्षाचे मंत्री विमान वाहतूक मंत्री यांनी विमान कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न केला, असं म्हणत रोहित पवारांनी विमान वाहतूक मंत्री यांच्या वक्तव्यावरती देखील आक्षेप घेतला आहे. दादांचा अपघात की घात झाल्यापासूनही राज्याचे मंत्री व्हीएसआरने प्रवास करत आहेत, इतर राज्यामध्ये देखील व्हीएसआर चालू आहे, सत्तेतील काही मोठे नेते व्हीएसआरच्या मालकाशी निगडीत आहेत, त्यांचे व्यवसाय आहेत, सत्तेतील लोकांच्या जवळचा तो माणूस आहे, म्हणून याचा सखोल तपास होत नसल्याचंही  रोहित पवारांनी म्हटलं आहे.

अपघातानंतर तो मायामी येथे गेला

टीडीपी पक्षाचे नेते रोहित सिंगच्या लग्नाला जात असतील, त्याचबरोबर टीडीपीचा नेते जर विमान वाहतूक मंत्री असेल, आणि व्हीएसआर कंपनी आत्तापर्यंत बंद होत नाही, त्याचे ऑपरेशन सुरू राहतात, कागदपत्रांची पुनर्संरचना आणि हाताळणी(realignment and manipulation)  होते, असं आमचं म्हणणं आहे, हैद्राबादचा बडा नेताही व्हिएसआरच्या मालकाशी निगडीत आहेत. तो रोहित सिंग कुठे आहे, तो भारतात नाही, अपघातानंतर तो मायामी येथे गेला आहे. त्यांची दुबई देखील कंपनी आहे, अमेरीकेतही कंपनी आहे, ही सगळी विमाने दुबई अमेरीकेच्या कंपनीत ट्रान्सफर केली जात आहेत, ज्या विमानामुळे अपघात, घात झाला, त्याचा मालक आज येथे नाही, त्याला कोणी मदत केली, सखोल तपास करून मालकाला ताब्यात घेऊन तपास करायला हवा होता, पण तसं झालं नाही, असंही रोहित पवारांनी म्हटलं आहे. तर या कंपनीला मुद्दाम वाचवण्याचा प्रयत्न होत आहे, सत्तेत असेलेल काही लोक त्यांना मुद्दाम वाचवत आहेत, म्हणून आमचं मत आहे, या विमान कंपनीवर बंदी घातली पाहिजे, आणि याचा सखोल तपास झाला पाहिजे, हा मोठा विषय आहे, असंही रोहित पवारांनी म्हटलं आहे.

आणखी वाचा

Comments are closed.