अपहरण झालेल्या तरूणीला शोधण्यासाठी 6 टीम रवाना; कॉल डिटेल्स अन् व्हॉट्सॲपचाही डेटा मागवला, गोपी
पुणे : इंदापूर तालुक्यातील भिगवण परिसरात लग्नाच्या खरेदीसाठी आई आणि भावासोबत गेलेल्या एका तरुणीचे भरदिवसा अपहरण झाल्याची (Bhigwan Kidnapping Case) धक्कादायक घटना काल (मंगळवारी ता. १७) उघडकीस आली आहे. दोन तरुणांनी तरुणीच्या आई व भावाच्या डोळ्यांत तिखट फेकून तरुणीचे नेल्याचा आरोप आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित तरुण-तरुणीमध्ये मोबाईलवरून संपर्क असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे ही घटना अपहरणाची (Bhigwan Kidnapping Case) आहे की प्रेमसंबंधातून घडलेला प्रकार, याबाबत विविध शक्यता तपासल्या जात आहेत. दरम्यान या घटनेप्रकरणी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी माहिती देताना सांगितलं की, आरोपीला शोधण्यासाठी (Bhigwan Kidnapping Case) सहा टीम रवाना केले आहेत. गोपीनीय आणि तांत्रिक तपास सुरू आहे. काल वातावरण तापलं होतं, सर्व समाजाच्या प्रतिनिधी सोबत आमचे बोलणे झाले आहेत, पोलीस काटेकोरपणे तपास करीत आहे असंही गिल यांनी म्हटलं आहे.(Bhigwan Kidnapping Case)
कुणीही ताणतणावाचे वातावरण निर्माण करू नये. पोलिसांकडून जन आक्रोश मोर्चाला कोणतीही परवानगी देण्यात आली नाही, कुटुंबाला आम्ही माहिती दिली तसेच आम्ही त्यांच्याकडून देखील माहिती घेतली आहे, सर्व प्रतिनिधी आम्हाला सहकार्य करत आहे. कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी आमचे प्रयत्न (Bhigwan Kidnapping Case) सुरू आहेत. पोलीस आणि प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन आम्ही केले आहे. आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. आरोपी आणि पीडित एकमेकांच्या घराशेजारी राहतात, ते संपर्कात होते, याचा तपास सुरू आहे, बाकी माहिती तपास पुर्ण झाल्यानंतर समोर येईल असंही संदीप सिंह गिल यांनी म्हटलं आहे. (Bhigwan Kidnapping Case)
हिंदू जन आक्रोश निषेध मोर्चाला पडळकर आणि संग्राम जगताप लावणार हजेरी
पोलिसांनी हिंदू जन आक्रोश निषेध मोर्चाला परवानगी नाकारली असताना मोर्चा काढण्यावर ते ठाम असल्याची माहिती आहे. या मोर्चाला भाजप नेते आणि आमदार गोपीचंद पडळकर आणि आमदार संग्राम जगताप लावणार हजेरी लावणार आहेत, दुपारी साडे तीन ते चार वाजण्याच्या दरम्यान पोलीस ठाण्यासमोर ठिय्या मांडणार आहेत. गुन्हेगारांना अटक करावी, तसेच मुलगी शोधून ताब्यात द्यावी ही प्रमुख मागणी असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.(Bhigwan Kidnapping Case)
आतापर्यंत या प्रकरणात काय झालं?
– काल दुपारी साडे तीनच्या दरम्यान लग्नाची खरेदी करून जात असताना भावाच्या आईच्या डोळ्यात चटणी टाकून मुलीचा अपहरण करण्यात आलं.
– रात्री मोठ्या संख्येने पोलीस ठाण्याबाहेर जमाव जमला होता.
– पोलिसांनी लवकरात लवकर आरोपींना अटक करावी या मागणीसाठी भिगवन बंदची हाक देण्यात आली.
– रात्री पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या दिल्यानंतर पुणे सोलापूर हायवे रोखून धरण्यात आला.
– अपहरण झालेल्या मुलीचे आणि मुलाचे घर शेजा शेजारी आहे.
– दोघांच्यात एक महिनाभरापासून फोनवर बोलणं होत होतं असे कॉल डिटेल्स पोलिसांनी काढलेत.
– व्हॉट्सअॅप माध्यमातून काय बोलणं झालं हे पोलीस काढत आहेत.
– मुलीचे वय 21 वर्ष आहे.
– अद्यापही मुलीचा शोध लावण्यात पोलिसांना यश आलं नाही.
– अपहरण झालेल्या मुलीचे 22 तारखेला लग्न आहे.
– आई, भाऊ आणि ती लग्नाच्या खरेदीवरून घरी जात असताना अपहरण करण्यात आलं आहे.
– आरोपी आणि अपहरण झालेली मुलगी एकमेकांना लहानपणापासून ओळखतात.
– शोधासाठी पोलिसांनी सहा पथके रवाना केली आहेत.
– पोलिसांनी 165 किलोमीटरचा रूट मॅप केला आहे.
– यामध्ये कोणताही धार्मिक ते निर्माण होऊ नये याची खबरदारी प्रत्येकाने घ्यावी.
– कोणत्याही प्रकारचे मोर्चे काढू नयेत असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
– जर कुणी अशा पद्धतीचे वर्तन केलं तर त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले.
– पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली आहे.
आणखी वाचा
Comments are closed.