मुंबई विमानतळावर मोठी कारवाई; हिरे, सोनं अन् कोट्यवधींचे अमली पदार्थ जप्त, 8 जणांना अटक

मुंबई : देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई (मुंबई) देश-विदेशातून येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. तर, मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरही प्रवाशांची नेहमीच वर्दळ असते. त्यामुळे, मोठी सुरक्षा यंत्रणा देखील येथे कार्यरत असल्याचं दिसून येतं. त्याच पार्श्वभूमीवर मुंबई विमानतळावर अनेकदा तपासणीत अंमली पदार्थ किंवा तस्करीचे सोनं (Gold) आढळून येतं.  नुकतेच, 4 ते 11 फेब्रुवारी 2026 या कालावधीत कस्टम विभागाने मोठी कारवाई करत कोट्यवधिचं साहित्य जप्त केलं आहे. याप्रकरणी, 8 जणांना अटकही करण्यात आलीय.

मुंबई कस्टम झोन – 3 (एअरपोर्ट) यांनी मोठी कारवाई करत विविध प्रकरणांत मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ, हिरे, सोने आणि परकीय चलन जप्त केले आहे. या कारवाईत एकूण 8 प्रवाशांना अटक करण्यात आली आहे. कस्टम्सकडून मिळालेल्या माहितीनुसार, कारवाई जवळपास 16.7 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ, 38 लाख रुपयांचे हिरे, 15 लाख रुपयांचं सोनं आणि विविध प्रकरणात 1.13 कोटी रुपयांचे परकीय चलन असा मोठा ऐवज जप्त करण्यात आला आहे.

कस्टमने जप्त केलेलं तस्करीतील साहित्य

सुमारे १६.७५६ किलो संशयित एनडीपीएस (हायड्रोपोनिक वीड) जप्त करण्यात आले असून त्याची अंदाजे किंमत ₹१६.७५६ कोटी इतकी आहे.

तसेच २४६.७५ कॅरेट नैसर्गिक व लॅब-ग्रोउन हिरे जप्त करण्यात आले असून त्यांची किंमत सुमारे ₹३८.२८ लाख आहे.

याशिवाय १०४ ग्रॅम २४ कॅरेट सोने जप्त करण्यात आले असून त्याची किंमत अंदाजे ₹१५.२४ लाख आहे.

विविध प्रकरणांत मिळून ₹१.१३ कोटींचे परकीय चलन देखील जप्त करण्यात आले आहे.

दरम्यान, कस्टम्स विभागाकडून विमानतळावर तस्करीविरोधातील कारवाई अधिक तीव्र करण्यात आली असून संबंधित प्रवाशांविरुद्ध एनडीपीएस व कस्टम्स कायद्यांतर्गत पुढील तपास सुरू आहे.

हेही वाचा

नक्षल्यांच्या मुळावर घाव; माओवाद्यांच्या दहशतीचे प्रतिक , 44 स्मारके भुईसपाट, सीआरपीएफने चालवला बुलडोझर

रोहित शेट्टी गोळीबार प्रकरणी महत्वाची अपडेट समोर, आरजू बिश्नोई हा आरोपींच्या संपर्कात असल्याची माहिती

आणखी वाचा

Comments are closed.