माझं आणि त्याचं प्रेम, मी घरी सांगितलेलं…नेमकं काय घडलेलं?, अपहरण झालेल्या तरुणीने प्रतिज्ञाप
भिगवण अपहरण प्रकरण: इंदापूर तालुक्यातील भिगवणमध्ये आई आणि भावासोबत लग्नासाठी सोन्याची खरेदी करून दुचाकीवरून घरी परतत असताना 21 वर्षीय तरुणीचे भरदिवसा अपहरण (Bhigwan Kidnapping Case) झाल्याची घटना मंगळवारी (दि. 17) दुपारी चारच्या सुमारास घडली. तरुणीच्या आईला व भावाला मारहाण करीत डोळ्यांत मिरचीपूड टाकून दोन सख्ख्या भावांनी तरुणीला जबरदस्तीने (Bhigwan Kidnapping Case) टेम्पोमध्ये नेल्याची फिर्याद तरूणीच्या घरातील व्यक्तींनी पोलिसांना दिली होती. मात्र हे सगळं खोटं असल्याचं तरुणीने स्पष्ट केलं आहे.
मुलगा आणि मुलगी अपहरण झाल्यानंतर श्रीगोंदा, अहिल्यानगर, शिक्रापूर, पुणे सासवड असा प्रवास करून महाबळेश्वरला गेले. महाबळेश्वरवरून मुलगी आणि मुलगा मध्यरात्री दीड वाजता बारामती शहर पोलीस ठाण्यात हजर झाले. त्यानंतर आता विविध खुलासे समोर येत आहे. पोलिसांनी साडेपाच वाजता मुलाला प्रायव्हेट गाडीतून घेऊन गेलेले आहेत. मुलीच्या मित्राला सुरक्षेच्या कारणास्तव अज्ञातस्थळी ठेवण्यात आलं आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
तरुणीने प्रतिज्ञापत्रात काय काय म्हटलंय? (Bhigwan Kidnapping Case)
संबंधित तरुणीने एक प्रतिज्ञापत्र तयार केलं आहे. या प्रतिज्ञापत्रात माझं आणि त्याचं प्रेम होतं. मी हे घरच्यांना सांगितलं होतं. दुसऱ्या मुलांसोबत लग्नास माझा विरोध होता. त्यामुळे संबंधित मुलासोबत मी स्वमर्जीने पळून गेलो, असं म्हटलं आहे. तसेच मिरचीपूड फेकल्याची जो गुन्हा दाखल केला आहे. तो खोटा असल्याचंही तरुणीने प्रतिज्ञापत्रात सांगितलं आहे. सोशल मिडीयावरून मला कळाले की, माझ्या आईने मला जबरदस्तीने माझ्या आईवर त्यांच्या हातातील लाकडी दांडके उगारून तसेच माझ्या आई व भाऊ यांच्या डोळयात मिरचीची पुड टाकून माझे अपहरण केले आहे तसेच माझ्या आईने खरेदी केलेली नथ व चांदीची अंगठी हिसकावून नेली आहे अशी खोटी व बनावट फिर्याद दिलेली आहे. सदरची फिर्याद ही माझ्या आईने कोणाच्यातरी सांगण्यावरून व कोणाच्यातरी दबावावरून खोटी व बनावट स्वरूपाची दिलेली असून आईच्या फिर्यादीमधील मजकुराप्रमाणे कोणत्याही प्रकारची घटना घडलेली नसून मी स्वतः माझ्या राजीखुषीने व मर्जीने 1 वर्षापासून असलेल्या प्रेमसंबंधामुळे आमचा एकमेकांवर विश्वास असल्याने निघून गेली होती. मी पुर्णपणे सज्ञान असलेने मला माझ्या आयुष्याबद्दल निर्णय घेण्याचे अधिकार आहेत, असंही तरुणीने प्रतिज्ञापत्रात सांगितलं आहे.
आतापर्यंत या प्रकरणात काय झालं? (Bhigwan Kidnapping Case)
– 17 फेब्रुवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास लग्नाची खरेदी करून जात असताना भावाच्या आईच्या डोळ्यात चटणी टाकून मुलीचा अपहरण करण्यात आलं.
– रात्री मोठ्या संख्येने पोलीस ठाण्याबाहेर जमाव जमला होता.
– पोलिसांनी लवकरात लवकर आरोपींना अटक करावी या मागणीसाठी भिगवन बंदची हाक देण्यात आली.
– रात्री पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या दिल्यानंतर पुणे सोलापूर हायवे रोखून धरण्यात आला.
– अपहरण झालेल्या मुलीचे आणि मुलाचे घर शेजा शेजारी आहे.
– दोघांच्यात एक महिनाभरापासून फोनवर बोलणं होत होतं असे कॉल डिटेल्स पोलिसांनी काढलेत.
– व्हॉट्सअॅप माध्यमातून काय बोलणं झालं हे पोलीस काढत आहेत.
– मुलीचे वय 21 वर्ष आहे.
– अद्यापही मुलीचा शोध लावण्यात पोलिसांना यश आलं नाही.
– अपहरण झालेल्या मुलीचे 22 तारखेला लग्न आहे.
– आई, भाऊ आणि ती लग्नाच्या खरेदीवरून घरी जात असताना अपहरण करण्यात आलं आहे.
– आरोपी आणि अपहरण झालेली मुलगी एकमेकांना लहानपणापासून ओळखतात.
– शोधासाठी पोलिसांनी सहा पथके रवाना केली आहेत.
– पोलिसांनी 165 किलोमीटरचा रूट मॅप केला आहे.
– यामध्ये कोणताही धार्मिक ते निर्माण होऊ नये याची खबरदारी प्रत्येकाने घ्यावी.
– कोणत्याही प्रकारचे मोर्चे काढू नयेत असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.
– जर कुणी अशा पद्धतीचे वर्तन केलं तर त्यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले.
– पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली आहे.
-अपहरण झालेली तरुणी 21 फेब्रुवारीला मध्यरात्री दीडच्या सुमारास बारामती शहर पोलीस ठाण्यामध्ये हजर झाली.
-मुलगी स्वतःच्या इच्छेने निघून गेली असल्याचा जबाब तरुणीने पोलिसांना दिला आहे. मुलीच्या मित्राला सुरक्षेच्या कारणास्तव अज्ञातस्थळी ठेवण्यात आलं आहे
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.