नरहरी झिरवाळांच्या कार्यालयातील लिपिकाला जामीन मंजूर, 35 हजारांची लाच स्वीकारताना सापडलेला रंगे

नरहरी झिरवाळ मंत्रालय लाच प्रकरण: अन्न व औषध प्रशासन विभागातील लाचखोरी प्रकरणात अटक करण्यात आलेल्या लिपिक राजू (राजेंद्र) ढेरिंगे (Raju Dheringe) याला मुंबई सत्र न्यायालयातील एसीबीच्या विशेष न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. न्यायालयीन कोठडीत रवानगी होताच त्याच्या जामिनावर सुनावणी घेण्यात आली आणि त्याला दिलासा मिळाला.

Narhari Zirwal Mantralaya Bribe Case: सत्र न्यायालयाचा दिलासा

मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एसीबी कोर्टाने ढेरिंगे याचा जामीन अर्ज मंजूर केला. दरम्यान, एसीबीने त्याला अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केले होते. न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आल्यानंतर लगेचच जामीन अर्जावर सुनावणी झाली.

Narhari Zirwal Mantralaya Bribe Case: मंत्री नरहरी झिरवळ यांची कठोर भूमिका

लाच प्रकरणाची गंभीर दखल घेत अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी संबंधित लिपिकाविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. केवळ चौकशीच नव्हे तर त्याची प्रतिनियुक्ती रद्द करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विभागातील दक्षता पथकाला सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले असून, वस्तुनिष्ठ व सर्वंकष अहवाल तातडीने सादर करण्यास सांगितले आहे.

Narhari Zirwal Mantralaya Bribe Case: घरझडतीत महत्त्वाची कागदपत्रे हाती

दरम्यान, एसीबीने ढेरिंगे याच्या नाशिक रोड येथील घराची काही दिवसांपूर्वी झडती घेतली होती. या झडतीत काही महत्त्वाची कागदपत्रे हाती लागल्याची माहिती आहे. ढेरिंगे हा मूळचा अन्न व नागरी पुरवठा विभागातील कर्मचारी असून, वर्षभरापूर्वी तो अन्न व औषध प्रशासन विभागात प्रतिनियुक्तीवर आला होता. तो मंत्र्यांच्या अपील विभागात कार्यरत होता.

Narhari Zirwal Mantralaya Bribe Case: नेमकं प्रकरण काय?

मंत्रालयाच्या दुसऱ्या मजल्यावर एसीबीने सापळा रचून ढेरिंगे याला अटक केली. औषध दुकानाचा निलंबित परवाना पूर्ववत करण्यासाठी त्याने 50 हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. तडजोडीनंतर 35 हजार रुपये स्वीकारताना त्याला रंगेहात पकडण्यात आले. कारवाईदरम्यान एसीबीचे अधिकारी थेट मंत्र्यांच्या कार्यालयात पोहोचले होते आणि संपूर्ण कार्यालय काही काळ ताब्यात घेण्यात आले होते. या घटनेमुळे मंत्रालयात खळबळ उडाली होती. आता ढेरिंगे याला जामीन मंजूर झाला असला तरी एसीबीचा तपास सुरूच आहे. घरातून मिळालेली कागदपत्रे, आर्थिक व्यवहार आणि या प्रकरणाचे धागेदोरे आणखी कुठपर्यंत पोहोचतात? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

आणखी वाचा

Narhari Zirwal Mantralaya Bribe Case: मंत्रालयातील लाचेची हादरवणारी कहाणी समोर येताच नरहरी झिरवाळ अ‍ॅक्शन मोडवर; खाजगी सचिवाला तातडीने केलं कार्यमुक्त

आणखी वाचा

Comments are closed.