चंद्रपूर महापालिका प्रकरणावर काँग्रेसचे वरिष्ठ नाराज,वडेट्टीवारांनी वरिष्ठांची मागितली माफी
नवी दिल्ली : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी आज पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीला लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह महाराष्ट्रासह इतर 6 राज्यांचे प्रमुख उपस्थित होते. या बैठकीला महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार उपस्थित होते. या बैठकीनिमित्त दिल्लीत दाखल झालेल्या विजय वडेट्टीवार यांनी चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीनंतर झालेल्या गोंधळाबाबत काँग्रेसच्या वरिष्ठांची माफी मागितली आहे.
चंद्रपूर महापालिका निवडणुकीनंतर महापौर निवडीपर्यंत झालेल्या गोंधळाबाबत काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठांनी नाराजी व्यक्त केली. यानंतरचंद्रपूर महानगर पालिकेतील महापौर- उपमहापौर पदाच्या निवडणुकीत झालेल्या पराभवा बद्दल काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी माफी मागितल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. बैठकीच्या सुरुवातीलाच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधी आणि के सी वेणुगोपाल यांची माफी मागितली. यावर नंतर बोलू अस म्हणत वरिष्ठांनी या विषयावर बोलणं टाळल्याचं माहिती सूत्रांनी दिली.
भारत अमेरिका ट्रेड डीलच्या विरोधात रणनीती ठरवण्यासाठी काँग्रेसच्या बैठक आज पार पडली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या घरी बैठकी झाली. राहुल गांधी यांच्यासह बैठकीला महाराष्ट्रासह इतर 6 राज्याच्या प्रमुख बैठकीला उपस्थित होते. बैठकीला महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ , कॉंग्रेस नेते विजय वड्डेट्टीवार यांच्यासह खासदार रजनी पाटील, के. सी. वेणुगोपाल, रणदीप सुरजेवाला, सुखंजिदर सिंह रंधावा. मध्यप्रदेशचे प्रदेशाध्यक्ष जीतू पटवारी, हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुख्खू या नेत्यांच्या उपस्थित बैठक झाली.
अमेरिका-भारत व्यापार करार आणि त्याचा शेतकऱ्यांवर होणारा परिणाम यावर बैठकीत होणार चर्चा झाली. सोबतच पक्षाची आगामी रणनीती काय असणार या संदर्भात चर्चा करण्यात आली.
चंद्रपूर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेसनं 27 जागा जिंकल्या होत्या. तर, काँग्रेसच्या पाठिंबा असलेल्या जनविकास आघाडीनं 3 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसला बहुमातासाठी काही जागांची आवश्यकता होती. मात्र, काँग्रेसमधील दोन गटांमधील वाद विकोपाला गेल्याचं राज्यानं पाहिलं. खासदार प्रतिभा धानोरकर आणि विजय वडेट्टीवार यांच्या गटातील वाद विकोपाला गेलेला पाहायला मिळालं. या दरम्यान मविआतील घटकपक्ष असलेल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नगरसेवकांचा पाठिंबा मिळवण्यात देखील काँग्रेसला अपयश आलं होतं. चंद्रपूरमध्ये भाजप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं एकत्र येत चंद्रपूर महानगरपालिकेत सत्ता स्थापन केली. चंद्रपूरमध्ये घडलेल्या प्रकाराची काँग्रेसच्या वरिष्ठ नेतृत्त्वाकडून दखल घेण्यात आली होती.
आणखी वाचा
Comments are closed.