स्वीकृत नगरसेवकपदासाठी शिवसेनेत जोरदार लॉबिंग, एकनाथ शिंदेंच्या निवासस्थानी पराभूत नगरसेवकांच्य

BMC Shiv Sena Swikrut Nagarsevak : बृहन्मुंबई महानगरपालिकेत (Mumbai Municipal Corporation) स्वीकृत नगरसेवकांच्या (Swikrut Nagarsevak) जागांवरून राजकीय हालचालींना वेग आला असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (मराठी) यांच्या शिवसेनेत (Shiv Sena) या पदांसाठी जोरदार लॉबिंग सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पालिकेत शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या स्वीकृत नगरसेवकांच्या दोन जागांसाठी अनेक इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

बीएमसी शिवसेना स्विकृत नगरसेवक : नंदनवन बांगल्यावार इच्छाकांच्य फेय्या

या पार्श्वभूमीवर काही माजी नगरसेवक तसेच पराभूत उमेदवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निवासस्थान असलेल्या नंदनवन बंगल्यावर फेऱ्या मारताना दिसत आहेत. स्वीकृत नगरसेवकपदासाठी वरिष्ठ नेत्यांकडे शिफारशी आणि संपर्क वाढवले जात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

BMC शिवसेना स्वकृत नगरसेवक : दोन्ही नवांची जोरदार चर्चा

सध्या या पदासाठी बोरिवलीचे माजी नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद आणि आमदार प्रकाश सुर्वे यांचे सुपुत्र राज सुर्वे यांच्या नावाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. पालिकेच्या निवडणुकीवेळी पक्षाने बाळकृष्ण ब्रीद यांना एबी फॉर्म दिला होता. मात्र काही कागदोपत्री त्रुटींमुळे त्यांना उमेदवारी अर्ज भरता आला नाही. त्या वेळी त्यांनी पक्षाने दिलेला एबी फॉर्म अपक्ष उमेदवाराला दिला होता. या पार्श्वभूमीवर पक्षाकडून त्यांना पुन्हा संधी दिली जाऊ शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.

BMC Shiv Sena Swikrut Nagarsevak : सुर्वेंची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न?

दुसरीकडे आमदार प्रकाश सुर्वे यांनी आपल्या मुलाला उमेदवारी मिळावी यासाठी आग्रही भूमिका घेतली होती. मात्र त्यावेळी तिकीट न मिळाल्याने ते नाराज असल्याची चर्चा होती. त्यामुळे राज सुर्वे यांना स्वीकृत नगरसेवकपद देऊन पक्षाकडून ही नाराजी दूर करण्याचा प्रयत्न होऊ शकतो, असे बोलले जात आहे.

बीएमसी शिवसेना स्वकृत नगरसेवक : अंतिम निर्णयाचे लक्ष्य

स्वीकृत नगरसेवकांच्या दोन जागांसाठी सुरू असलेल्या या लॉबिंगमुळे शिवसेनेत अंतर्गत हालचालींना वेग आला आहे. अखेर पक्ष नेतृत्व कोणाला संधी देणार, याकडे आता मुंबईच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

BMC Election Result 2026: मुंबई महापालिकेतील पक्षीय बलाबल

मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजपचे 89 आणि शिवसेनेचे 29 नगरसेवक निवडून आले आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेचे 65 नगरसेवक निवडून आले आहेत तर मनसेचे 6 नगरसेवक निवडून आले आहेत. काँग्रेसचे 24 नगरसेवक, एमआयएमचे 8 नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे 3, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 आणि समाजवादी पक्षाचे 2 नगरसेवक यंदाच्या मुंबई महापालिका निवडणुकीत विजयी झाले आहेत.

आणखी वाचा

Maharashtra Police: ‘खाकी स्वॅग’चा ट्रेंड आटोक्यात येणार, पोलिसांना गणवेशात सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करण्यास बंदी; नेमकं कारण काय?

आणखी वाचा

Comments are closed.