अजित पवारांच्या विमानाचा ‘तो’ पायलट जिवंत आहे का, अपघातामागे सुनियोजित कट? अमोल मिटकरींचा गंभीर
अजित पवार विमान अपघातावर अमोल मिटकरी : अजित पवारांच्या विमान अपघातावेळी आलेला पायलट सुमित कपूर हा सुसाईड बॉम्बर म्हणून आला होता का? ‘लिट्टे’ने माजी पंतप्रधान राजीव गांधी (Rajiv Gandhi) यांची हत्या केली तशीच अजित पवार (Ajit Pawar) यांची हत्या झालीय का? असा गंभीर सवाल राष्ट्रवादीचे आमदार म्हणून मिटकरी (Amol Mitkari) यांनी उपस्थित केला. जर कपूर यांची पत्नी सुमित कपूर (Sumit Kapoor) जिवंत असल्याचे म्हणत असेल तर विमान अपघातात खरंच सुमित कपूरचा मृत्यू झाला का? अशी शंकाही अमोल मिटकरी यांनी बोलून दाखवली. ते अकोला जिल्ह्यातल्या बाळापुर तालुक्यातील पारस फाटा येथे ‘मुरलीधर राऊत मित्र मंडळा’ने आयोजित केलेल्या शिवजयंती कार्यक्रमात बोलत होतेय. अजित पवारांच्या विमान अपघाताबद्दल मोठं गूढ असताना महाराष्ट्र इतका शांत कसा? असा सवालही त्यांनी केलाय. अजित पवार हे महाराष्ट्राला न मिळालेले शिव विचारांचे सर्वोत्तम मुख्यमंत्री होते, असेही मिटकरी यांनी आपल्या भाषणात म्हटले. (Maharashtra Politics news)
अजित पवारांच्या विमानाचे आधीचे पायलट म्हणून जबाबदारी असलेले कॅप्टन साहिल मदन आणि कॅप्टन यश हे कोणत्या ट्रॅफिकमध्ये अडकले होते?. त्याचे सीसीटीव्ही फुटेज कुठे आहेत? ते दोघे सध्या कुठे आहेत? असा सवालही त्यांनी केलाय. अजित पवारांचा मृत्यू म्हणजे गोजूबावीच्या माळरानावरचं न उलगडलेलं गूढ असल्याचं ते म्हणालेय. ‘ब्लॅक बॉक्स’चा डाटा आणखी काही दिवस देऊ नका. मात्र, सीसीटीव्ही फुटेज का देत नाही? असा सवालही त्यांनी विचारला.
Ajit Pawar Death: अजितदादांच्या शोकप्रस्तावाचे शब्द ऐकताना कानात शिसं ऐकल्यासारखं होईल: मिटकरी
अजितदादांनी मला तीन वेळेस तालिकेवर बसवले. राज्याचे मुख्यमंत्री खाली बसायचे आणि मी वरती खुर्चीवर बसायचो. माझ्या विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा कालावधी 13 मे रोजी संपणार आहे. पण मला वाईट असे वाटते की, दरवर्षी अजितदादा असायचे. आम्ही पहिल्या दिवशी त्यांना गेटवर घ्यायला जायचो. राज्यपालांचे अभिभाषण झाल्यानंतर बुके देऊन अजितदादांना म्हणायचो की, हे बजेटचे अधिवेशन आहे. आर्थिक पाहणी अहवाल आम्हाला वाचायला मिळावा. तेव्हा दादा सांगायचे की, अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी ज्यांचे निधन झाले आहे, त्यांचा शोक प्रस्ताव असतो. पण, आता माझ्या जीवनातलं दुर्दैव बघा की, उद्या पहिल्याच दिवशी त्यांच्या नावाचा शोक प्रस्ताव मांडला जात असताना मी त्या सभागृहात असेल. माझ्यासारखा कमनशिबी आणि दुर्दैवी व्यक्ती दुसरी कोणी नसेल. अजित पवार यांच्या बाबतीत शोक प्रस्ताव हा काळीज चिरणारा प्रसंग आहे. शोक प्रस्तावावरचे शब्द कानांत शिसे ओतल्यासारखे असतील, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले.
आणखी वाचा
आणखी वाचा
Comments are closed.